मालेगावी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:58 PM2018-02-14T15:58:47+5:302018-02-14T15:58:58+5:30

मालेगाव : राज्य सेवेच्या प्रसिद्ध झालेल्य जाहिरातीत साडेचारशे पेक्षा जास्त जागा वाढवाव्यात, पोलीस भरतीच्या पदांमध्ये बाराशे पर्यंत जागांची वाढ करावी, २३ हजार रिक्त शिक्षकांच्या जागा भराव्यात यासह इतर पंधरा मागण्यांप्रश्नी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया संतप्त विद्यार्थ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी निवासी नायब तहसिलदार एम. एस. कारंडे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

 Students from Malegaon Students removed | मालेगावी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

मालेगावी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

Next

मालेगाव : राज्य सेवेच्या प्रसिद्ध झालेल्य जाहिरातीत साडेचारशे पेक्षा जास्त जागा वाढवाव्यात, पोलीस भरतीच्या पदांमध्ये बाराशे पर्यंत जागांची वाढ करावी, २३ हजार रिक्त शिक्षकांच्या जागा भराव्यात यासह इतर पंधरा मागण्यांप्रश्नी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया संतप्त विद्यार्थ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी निवासी नायब तहसिलदार एम. एस. कारंडे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसमोर अडचणी व समस्या निर्माण झाल्या आहेत. हजारो विद्यार्थ्यांना शासनाच्या नोकरी संबंधीच्या धोरणाचा फटका बसत आहे. विविध रिक्तपदे भरली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शासनाने १७ हजार रिक्तपदे तातडीने भरावीत, संयुक्त परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणे स्वतंत्र परिक्षा घेऊन पंधराशे पेक्षा जास्त वर्गांची जाहिरात काढण्यात यावी. तामिळनाडू लोकसेवा आयोगाचा पॅर्टन राबवावा, तलाठी परीक्षा एमपीएससीद्वारे घ्यावी, स्पर्धा परीक्षांचा शुल्क माफ करावा, ३० टक्के नोकर कपात धोरण रद्द करावे, चतुर्थश्रेणी पदांची कंत्राटी पद्धत रद्द करुन ती नियमित भरावी यासह विविध मागण्यांप्रश्नी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. मोर्चाला येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरूवात झाली. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मोर्चा कॅम्परोड, एकात्मता चौक कॉलेजरोड मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला होता. विद्यार्थ्यांनी यावेळी पोलीस भरतीच्या जागा वाढविण्यात याव्यात, राज्य शासनाचे रिक्तपदे लवकर भरावीत अशा विविध मागण्यांचे फलक हातात घेतले होते. यावेळी निवासी नायब तहसिलदार एम. एस. कारंडे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात अंकुश मायाचारी, राजेंद्र निकम, अविनाश वाघ, गणेश पवार, अशोक वाघ, संदीप वाघमारे, किरण शेळके, अमोल जाट, गणेश चव्हाण, देवा खरे, भरत राऊत, प्रशांत अहिरे, राहूल नेमणार आदिंसह मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

Web Title:  Students from Malegaon Students removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक