देशाच्या अवकाश संरक्षण सिद्धतेला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:00 AM2019-03-30T01:00:13+5:302019-03-30T01:00:40+5:30

भारताने उपरोधक शस्त्र म्हणजेच ए सॅट लाइव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्याने भारताला अवकाश संशोधन संस्थेला मोठे ऐतिहासिक यश मिळाले आहे.

 Strengthening the country's space defense | देशाच्या अवकाश संरक्षण सिद्धतेला बळ

देशाच्या अवकाश संरक्षण सिद्धतेला बळ

Next

एक्सपर्ट व्ह्यू

भारताने उपरोधक शस्त्र म्हणजेच ए सॅट लाइव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्याने भारताला अवकाश संशोधन संस्थेला मोठे ऐतिहासिक यश मिळाले आहे. आपण एअर स्ट्राइक करू शकतो हे जगाने बघितले आहे, परंतु त्यापलीकडे जाऊन अवकाश क्षेत्रातदेखील संरक्षणासाठी आपण सज्ज झालो आहेत. ही मोठी उपलब्धी भारताच्या दृष्टीने आहे. विशेषत: सद्य स्थितीत शेजारील राष्टशी सध्या सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हे खूप सूचक आणि मोठे यश आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतानेच ही क्षमता सिद्ध केले आहे.
बदलत्या काळात युद्धाचे तंत्र बदलू लागले आहे. त्यासाठी वापरली जाणारी माध्यमेदेखील बदलली जात आहे. अवकाशातील संरक्षण हेदेखील आता काळाची गरज बनली आहे. इस्त्रो आणि डीआरडीओ या यंत्रणांनी या संदर्भातील मोठी कामगिरी केल्याने ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. भारताने मिसाइलच्या सहाय्याने अवकाशात असलेला कमी उंचीवर असलेला उपग्रह (लो आर्बिट) पाडल्याने असा उपग्रह क्षेपणास्त्राने पाठविण्याचे तंत्र आपण साध्य केले आहे. सध्या तणावाच्या स्थितीमुळे अनेकांना हा विषय समजला नाही. नक्की कोणाचा उपग्रह पाडला किंवा भारताला उपद्रव देणाऱ्या एका राष्टशी संबंधित हा विषय आहे काय अशी चर्चा यातून सुरू झाली. मुळात असा कोणताही प्रकार नाही. प्रात्यक्षिक करण्यासाठी भारतानेच एक उपग्रह अवकाशात सोडला होता आणि तोच पाडला आहे. त्यामुळे भारताचे फार मोठे नुकसान झाले असेही नाही. कारण तो अवकाशात कमी उंचीवर होता.
भविष्यात अशाप्रकारचा एखादा उपग्रह भारतीय संरक्षणाला बाधक अशाप्रकारचे कृत्य करीत असेल हेरगिरी किंवा छायाचित्र घेण्याचे काम भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने घातक असल्यास भारत त्याला पाडू शकतो ही मारक क्षमता यातून जोखली गेली आहे. हे करताना भारताने युनोच्या स्पेस लॉचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे. म्हणजेच अन्य देशांना नुकसान होईल किंवा त्यांच्या उपग्रहांची हानी होईल अशाप्रकारची कृती भारताने केलेली नाही.
मुळातच भारतात विक्रम साराभाई यांच्यासारख्या धुरिणींनी इस्त्रो स्थापन करतानाच अंतराळ कार्यक्रम हा विधायक कार्य म्हणजेच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी असले अशीच भूमिका घेतली होती. युनोचीदेखील तीच भूमिका आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून झटणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी आज मैलाचा दगड ठरेल, अशी कामगिरी केली असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
दळणवळणासह विविध उपयुक्तता
देशहिताच्या दृष्टिकोनातून तसेच दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारचे उपग्रह भारतासह अनेक देश अंतराळात सोडतात. भारताने उपग्रह सोडल्यानंतर त्याचा दळणवळण, हवामान, शेती, मासेमारी करणारे यांच्यासह अन्य मानवी जीवनाच्या उपयुक्ततेसाठी सोडत असतो. संरक्षणदृष्ट्या अशाप्रकारचे अनेक उपग्रह भारत सोडत असतोच आताही  १ एप्रिल रोजी उपग्रह सोडले जाणार आहे.

Web Title:  Strengthening the country's space defense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.