महात्मा फुले यांच्या नियोजित स्मारक स्थळाची संरक्षण राज्यमंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 04:46 PM2019-02-13T16:46:22+5:302019-02-13T16:48:41+5:30

मालेगाव मध्य : शहरातील मोसमपूलवरील प्राथमिक मराठी शाळेच्या जागेवर महात्मा ज्योतिबा फुले यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी महात्मा ज्योतीबा फुले स्मारक कृती समितीच्या पदाधिका-यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तत्पूर्वी खासदार सुभाष भामरे यांनी नियोजित स्मारक स्थळाला भेट देवून पाहणी केली.

The State Minister's Survey of the Protected Monument of Mahatma Phule | महात्मा फुले यांच्या नियोजित स्मारक स्थळाची संरक्षण राज्यमंत्र्यांकडून पाहणी

महात्मा फुले यांच्या नियोजित स्मारक स्थळाची संरक्षण राज्यमंत्र्यांकडून पाहणी

Next

यावेळी मनपा आयुक्त किशोर बोर्डे उपस्थित होते.लोढा मार्केट ते गांधी पुतळ्यापर्यंत एकूण २८ गुंढे जमीन आहे. त्यात काही भागावर ब्रिटीश कालीन दगडी इमारत आहे. सध्या ही पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. ही संपूर्ण जागा महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मारकास देण्यात यावी व येथे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. कृती समितीच्या वतीने सुरेश निकम, माजी नगरसेवक गुलाब पगारे, बापू पाटील व समितीच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत खासदार भामरे यांनी सदर जागेची पाहणी केली. या स्मारकासाठी मनपा, राज्य सरकार व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन कृती समितीच्या पदाधिका-यांना भामरे यांनी दिले.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, कैलास तिसगे, जितेंद्र देसले, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष धर्मा भामरे, हरिप्रसाद गुप्ता, सुरेश गवळी, रामदास पगारे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The State Minister's Survey of the Protected Monument of Mahatma Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.