श्रीमद्भागवत संगीतमय ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:15 PM2018-02-13T23:15:33+5:302018-02-13T23:52:32+5:30

पाटोदा : आई-वडिलांची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असून, आईवडिलांची सेवा केल्याने भगवंत प्राप्ती होते म्हणून मनुष्य जीवनात प्रत्येकाने आईवडिलांची सेवा करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी.

Start of Srimad Bhagavat Gautam Gyanjyagad Sohal | श्रीमद्भागवत संगीतमय ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ

श्रीमद्भागवत संगीतमय ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ

Next
ठळक मुद्देआईवडील लेकराचे हित जपतातउपकार फिटणार नाही

पाटोदा : आई-वडिलांची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असून, आईवडिलांची सेवा केल्याने भगवंत प्राप्ती होते म्हणून मनुष्य जीवनात प्रत्येकाने आईवडिलांची सेवा करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, असे आवाहन वेदांताचार्य ह.भ.प. प्रभाकर महाराज शास्त्री (आळंदी देवाची) यांनी मुरमी, ता.येवला येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेप्रसंगी केले. प्रत्येक आईवडील हे आपल्या लेकराचे हित जपत असतात तसेच कोणत्याही लाभाशिवाय आपल्या मुलावर प्रेम करतात. किती ही कष्ट झाले तरी ते आपल्या लेकरांसाठी सहन करतात म्हणून मुलाने
आपल्या चामड्याची चप्पल जरी आईवडिलांना दिली तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत, असेही ते शेवटी म्हणाले. सप्ताहात दररोज पहाटे काकडा भजन, सायंकाळी हरिपाठ, गीता पारायण, रात्री श्रीमद्भागवत कथा या प्रकारे कार्यक्र म होणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमास प.पू. सद्गुरू विश्वनाथ महाराज, सहकार नेते अंबादास बनकर, विठ्ठलराव शेलार, अंबादास महाराज जगताप, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, शिवाजी महाराज गायके, सूर्यभान नाईकवाडे, बाळासाहेब पिंपरकर, बाबूशेठ कासलीवाल, भास्कर येवले, राजाभाऊ घोडके, ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणिस रवींद्र शेलार, सरपंच रघुनाथ शिंदे, श्रीकृष्णा गरुडे, उपसरपंच नारायण गुंजाळ, फकिरा निकम, चेअरमन बाजीराव जगताप, निवृत्ती ठोंबरे, पांडुरंग गायके, मोहन महाले, भास्कर शिंदे, अमृता शिंदे आदी मान्यवर व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथेचे आयोजन पुढील सात दिवस असणार असून, शेवटी सोमवारी (दि. १९) स. १० ह.भ.प. शिवाजी महाराज तळेकर (भालूर) यांचे काल्याचे कीर्तन होईल़

Web Title: Start of Srimad Bhagavat Gautam Gyanjyagad Sohal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक