राष्टÑीय योगा स्पर्धेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:18 AM2017-09-03T01:18:49+5:302017-09-03T01:19:14+5:30

राष्ट्रीय योगा फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन आणि नाशिक योगा कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेला नाशकात प्रारंभ करण्यात आला.

Start of National Yoga Tournament | राष्टÑीय योगा स्पर्धेला प्रारंभ

राष्टÑीय योगा स्पर्धेला प्रारंभ

Next

सातपूर : राष्ट्रीय योगा फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन आणि नाशिक योगा कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेला नाशकात प्रारंभ करण्यात आला.
वाढते औद्योगिकीकरण आणि वाढते प्रदूषण यामुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. शारीरिक व मानिसक संतुलन चांगले ठेवण्यासाठी योगा वरदान ठरले आहे. म्हणूनच योगाचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी राष्ट्रीय योगा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा ६ ते ८० वयोगटातील स्पर्धकांसाठी घेण्यात येत आहे. या स्पर्धेत विविध १८ राज्यांतील ९२२ स्पर्धक सहभागी झालेले आहेत. ५३ राष्ट्रीय योगपंच परीक्षणाचे काम पहात आहेत. नाशिकला आयोजित ही ३० वी राष्ट्रीय स्पर्धा असून, महाराष्ट्रात नाशिकला ही स्पर्धा घेण्याचा पहिला मान मिळालेला आहे. स्पर्धेला प्रारंभ करण्यापूर्वी महात्मानगर मैदान येथून ते नक्षत्र लॉन्सपर्यंत स्पर्धकांची प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर योगशिक्षक विश्वास मंडलिक यांनी योग ध्वज फडकावून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, नाशिक योगा कल्चरचे अध्यक्ष डॉ. यू. के. शर्मा, उपाध्यक्ष व्हिनस वाणी, प्रज्ञा पाटील, सुरेश गांधी, गौरव केदारे, संतोष मिश्रा, वंदना रकिबे, मिलिंद तारे, उदय रकिबे, गौरंगी पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Start of National Yoga Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.