पाटोदा परिसरात पावसाचा शिडकावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 08:34 PM2019-04-12T20:34:07+5:302019-04-12T20:34:30+5:30

पाटोदा : पाटोदा आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आहे त्यामुळे नागरिक उन्हाच्या काहिलीने हैराण झाले असतानाच आज शुक्र वार १२ एप्रिल दुपारी साडेचार सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली.

Sprinkle rain in Patoda area | पाटोदा परिसरात पावसाचा शिडकावा

पाटोदा परिसरात पावसाचा शिडकावा

Next
ठळक मुद्देपाटोदा, ठाणगाव, पिंपरी कानडी आदी गावातही पावसाने हजेरी लावली

पाटोदा : पाटोदा आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आहे त्यामुळे नागरिक उन्हाच्या काहिलीने हैराण झाले असतानाच आज शुक्र वार १२ एप्रिल दुपारी साडेचार सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली.
सध्या परिसरात उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांची तयार कांदा चाळीत साठवण्याची लगबग सुरू आहे. अशातच पावसाने सुमारे वीस ते बावीस मिनिट हजेरी लावल्याने शेतकºयांची कांदा झाकण्यासाठी मोठी धावपळ झाली.
पाऊस अचानक सुरू झाल्याने शेतकरी वर्गाला कांदा झाकण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिक कागदाची शोधाशोध करावी लागली पाऊस उघडल्या नंतर काही शेतकºयांनी रात्रीच्या वेळेस पाऊस आल्यास ऐन वेळी धावपळ नको म्हणून तातडीने प्लास्टिक कागद खरेदी करून शेतातील कांदा भिजू नये म्हणून झाकून ठेवला आहे. परिसरातील पाटोदा, ठाणगाव, पिंपरी कानडी आदी गावातही पावसाने हजेरी लावली आहे. ( फोटो १२ पाटोदा रेन)

Web Title: Sprinkle rain in Patoda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस