आमदार चषक कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद ; दंगल : सिन्नरच्या स्पर्धेत ३०० पुरुष, तर ८० महिला कुस्तीपटूंचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:07 AM2017-11-30T00:07:20+5:302017-11-30T00:16:30+5:30

सिन्नर : येथील वंजारी समाज मैदानावर सुरू असलेल्या क्रीडामहोत्सवांतर्गत बुधवारी ६१व्या आमदार कुस्ती चषक स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ झाला. जिल्हाभरातील ३०० पुरुष, तर ८० महिला कुस्तीपट्टूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध गटात पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना भूगाव (पुणे) येथे होणाºया राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

Spontaneous response to MLA Trophy Championship; Dangl: 300 men and 80 women wrestlers participate in Sinnar's competition |  आमदार चषक कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद ; दंगल : सिन्नरच्या स्पर्धेत ३०० पुरुष, तर ८० महिला कुस्तीपटूंचा सहभाग

 आमदार चषक कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद ; दंगल : सिन्नरच्या स्पर्धेत ३०० पुरुष, तर ८० महिला कुस्तीपटूंचा सहभाग

googlenewsNext
ठळक मुद्देक्रीडामहोत्सवांतर्गत बुधवारी ६१व्या आमदार कुस्ती चषक स्पर्धा सिन्नर : येथील वंजारी समाज मैदानावर निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ

सिन्नर : येथील वंजारी समाज मैदानावर सुरू असलेल्या क्रीडामहोत्सवांतर्गत बुधवारी ६१व्या आमदार कुस्ती चषक स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ झाला. जिल्हाभरातील ३०० पुरुष, तर ८० महिला कुस्तीपट्टूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध गटात पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना भूगाव (पुणे) येथे होणाºया राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेचा मंगळवारी समारोप झाल्यानंतर बुधवारी सकाळी आमदार चषक कुस्ती स्पर्धेस प्रारंभ झाला. येथील वंजारी समाज मैदानावर होत असलेल्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, नगरसेवक शैलेश नाईक, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड यांच्यासह पंचायत समिती, नगरपालिका व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कुमार गट मुले (मॅट), महिला (मॅट), महाराष्टÑ केसरी चाचणी मुले (मॅट) व महाराष्टÑ केसरी चाचणी मुले (माती) अशा चार गटात या स्पर्धा पार पडल्या. ४२ किलो वजनापासून ते ११० किलो वजनापर्यंतच्या गटात स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक विभागाचे १० गट करण्यात आले होते. महिला गटात ४५ ते ६६ किलो वजन गटात महिला कुस्तीपटू सहभागी झाल्या होत्या. महाराष्टÑ केसरी चाचणी स्पर्धेत ५७ ते १३० किलो वजनी गटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी जिल्हाभरातील क्रीडाप्रेमींनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. कुस्तीपट्टूंचे डाव-प्रतिडाव पाहून क्रीडाप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फिटले. कुस्ती स्पर्धेसाठी दोन मैदान करण्यात आले होते. एका मैदानावर माती, तर दुसरे मैदान मॅटसाठी होते. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे कुस्तीपट्टूंमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता.
कुस्ती स्पर्धा यशस्वीतेसाठी उदय सांगळे यांच्यासह नाशिक जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष गोरक्षनाथ बलकवडे, उपाध्यक्ष रवींद्र मोरे, उत्तम दळवी, विशाल बलकवडे यांनी नियोजन केले होते. पंच म्हणून ज्ञानेश्वर शिंदे, विशाल बलकवडे, तेजस बलकवडे, अरविंद गवळी, रामचंद्र पालवे, गणपत चुंभळे, संपत गोवर्धने यांनी काम पाहिले.
राज्य व राष्टÑीय पातळीवरील कुस्तीपट्टूंचा सहभाग
येथील वंजारी समाज मैदानावर अतिशय नियोजनबद्ध आमदार चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे ३५ राज्य पातळीवरील तर १५ राष्टÑीय पातळीवरील कुस्तीपट्टूंनी सहभाग घेऊन आमदार चषक स्पर्धेची शान वाढवली.

 

Web Title: Spontaneous response to MLA Trophy Championship; Dangl: 300 men and 80 women wrestlers participate in Sinnar's competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा