दुचाकी घसरून ओझरचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:53 AM2018-07-17T00:53:19+5:302018-07-17T00:53:37+5:30

औरंगाबाद महामार्गावरील नांदूर रोडने जाणारी दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१५) दुपारच्या सुमारास घडली़ विशाल चंद्रशेखर सचान (२४, रा. कानपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. एअरफोर्स स्टेशन, ओझर मिग) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

 The speed of the bike collapsed and the youth killed | दुचाकी घसरून ओझरचा युवक ठार

दुचाकी घसरून ओझरचा युवक ठार

Next

नाशिक : औरंगाबाद महामार्गावरील नांदूर रोडने जाणारी दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१५) दुपारच्या सुमारास घडली़ विशाल चंद्रशेखर सचान (२४, रा. कानपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. एअरफोर्स स्टेशन, ओझर मिग) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.  आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास विशाल सचान हा आपल्या मित्रासमवेत दुचाकीवरून येत होता़ औरंगाबाद रोडवरील नांदूर रोडवर त्यांची दुचाकी घसरल्याने अपघात झाला़ यामध्ये चालकाच्या पाठीमागे बसलेल्या विशालच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले.
कर्नल डॉ़ ए़ पी़ दुबेवा यांनी दिलेल्या माहितीनुसार आडगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कॉस्मेटिकचे दुकान फोडले
मखमलाबाद रोडवरील जाणता राजा कॉलनीतील रहिवासी रविश कोहली यांच्या कॉस्मेटिकच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी अठरा हजार रुपयांची रोकड, नऊ मोबाइल फोन व कॉस्मेटिक वस्तू असा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. १४ व १५ जुलैदरम्यान ही घटना घडली असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पवारवाडीतील तरुणीची आत्महत्या
जेलरोडच्या पवारवाडीतील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास घडली़ संगीता वसंत राज (२८, भव्य हॉईट्स, पवारवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे़ ही बाब लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title:  The speed of the bike collapsed and the youth killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.