तुरुंगवासात रवानगी होताच थकीत साडेतीन लाख केले जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 07:40 PM2019-02-24T19:40:03+5:302019-02-24T19:40:23+5:30

लासलगाव : येवला तालुक्यातील मुखेड येथील बँक आफ महाराष्ट्र शाखेचे थकीत कर्ज वसुली प्रकरणात कर्जदार चांगदेव शिंदे यास बँकेच्या वसुलीप्रकरणात पकडून आणल्यावर न्यायालयाने दिवाणी तरुंगवासात रवानगी केली दुसऱ्याच दिवशी कर्जदाराने साडेतीन लाखाची धकीत रक्कम जमा केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

 As soon as the prison was released, the amount of three lakhs of taka was made | तुरुंगवासात रवानगी होताच थकीत साडेतीन लाख केले जमा

तुरुंगवासात रवानगी होताच थकीत साडेतीन लाख केले जमा

Next
ठळक मुद्देलासलगाव : मुखेड येथील कर्जदाराविरुध्द दिवाणी दावा

लासलगाव : येवला तालुक्यातील मुखेड येथील बँक आफ महाराष्ट्र शाखेचे थकीत कर्ज वसुली प्रकरणात कर्जदार चांगदेव शिंदे यास बँकेच्या वसुलीप्रकरणात पकडून आणल्यावर न्यायालयाने दिवाणी तरुंगवासात रवानगी केली दुसऱ्याच दिवशी कर्जदाराने साडेतीन लाखाची धकीत रक्कम जमा केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
मुखेड येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेकडुन घेतलेले कर्ज न फेडल्याने देवगांव ता. निफाड येथील कर्जदार चांगदेव पुंडलिक शिंदे याचेविरुध्द निफाड न्यायालयात सात लाख सत्तर हजार सत्तर व त्यावरील व्याज वसुली दरखास्त दाखल करण्यात आली होती.
सदर प्रकरणात न्यायालयाने शिंदे विरुध्द दिवाणी पकड वॉरंट जारी केले होत,े मात्र न्यायालयाच्या बेलिफाच्या तावडीतुन कर्जदार सापडले नाही म्हणुन पोलिस मदतीने कर्जदार चांगदेव पुंडलिक शिंदे यांना पकडुन निफाडचे वरीष्टस्तर दिवाणी न्यायाधीश संग्राम काळे यांचेसमोर हजर केले. बँकेच्यावतीने अ‍ॅड. अरविंद बडवर यांनी युक्तिवाद करत कर्जदाराची एकरकमी परतफेड करण्याची पत असल्याचे नमुद केले.
न्यायालयाने कर्जदारास एक महिना दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा सुनावत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती. कर्जदार चांगदेव शिंदे कारागृहात गेल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी नातेवाईकांच्या मदतीने न्यायालयात हजर होऊन बँक आॅफ महाराष्ट्राचे थकीत कर्जापोटी साडेतीन लाख भरले. न्यायालयाने बँकेची उर्वरीत रक्कम त्वरीत भरण्याबाबत आदेश करत कर्जदाराची कारागृहातुन मुक्तता करण्याचे आदेश दिले.

Web Title:  As soon as the prison was released, the amount of three lakhs of taka was made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.