‘कळसुबाई’ शिखरावर सैनिकांनी फडकावला तिरंगा! 'हर शिखर तिरंगा’ मोहिमेत देशातील २८पर्वत करणार सर!

By अझहर शेख | Published: August 16, 2023 02:46 PM2023-08-16T14:46:28+5:302023-08-16T14:47:08+5:30

दोन तासांत शिखरमाथा गाठल्यानंतर तेथील मंदिराजव या चमूच्या सैनिकांनी तिरंगा मोठ्या अभिमानाने अन् सन्मानाने फडकाविला.

Soldiers hoisted tricolor on 'Kalsubai' peak, 28 mountains of the country will be covered in 'Har Shikhar Triranga' campaign! | ‘कळसुबाई’ शिखरावर सैनिकांनी फडकावला तिरंगा! 'हर शिखर तिरंगा’ मोहिमेत देशातील २८पर्वत करणार सर!

‘कळसुबाई’ शिखरावर सैनिकांनी फडकावला तिरंगा! 'हर शिखर तिरंगा’ मोहिमेत देशातील २८पर्वत करणार सर!

googlenewsNext

नाशिक : हलका-मध्यम सरींचा वर्षाव अंगावर झेलत भारतमातेचा जयजयकार करत सैन्याच्या ‘ॲडव्हेंचर विंग’च्या चमूने मंगळवारी (दि.१५) राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईवर चढाई सुरू केली. दोन तासांत शिखरमाथा गाठल्यानंतर तेथील मंदिराजव या चमूच्या सैनिकांनी तिरंगा मोठ्या अभिमानाने अन् सन्मानाने फडकाविला.

भारतीय सैन्यदलातील कर्नल रणवीर सिंह जामवाल यांच्या नेतृत्वात मे महिन्यात ‘हर शिखर तिरंगा’ ही आगळीवेगळी साहसी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील २८ राज्यांमध्ये भ्रमंती करत तेथील सर्वोच्च शिखरावर चढाई करून तिरंगा फडकाविला जात आहे. मंगळवारी या चमूने कळसुबाईच्या रूपाने १५वे सर्वोच्च शिखर सर केले. हा चमू राजस्थानच्या गुरूशिखर, गुजरातचे गिरणार आणि मध्यप्रदेशच्या धूपगडावर तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला नाशिक शहरात दाखल झाला होता. या चमूने मंगळवारी (१५) पहाटे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी पोहचला. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १ हजार ६४६ मीटर इतकी आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटरपर्यंत आहे. 

झुंजुमुंज होताच जामवाल यांच्यासह १३सैनिक व स्थानिक युवकांनीसुद्धा हातात तिरंगा ध्वज खेत भारतमातेचा जयघोष केला. एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत कळसूबाई शिखरावर चढाई सुरू केली. सकाळी आठ वाजता माथा गाठून ध्वजारोहण करत तिरंग्याला ‘सॅल्यूट’ केला. यावेळी स्थानिक युवक, युवतींनी जल्लोषपूर्ण वातावरणात देशभक्तीपर घोषणा देत शिखर दणाणून सोडला. यानंतर पुढील प्रवासात दुपारी मुंढेगावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत जामवाल यांनी संवाद साधला. त्यानंतर नाशिकमधून पुढे गोव्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.

ऑगस्टमध्ये या शिखरांवर फडकवणार तिरंगा
ऑगस्टअखेरपर्यंत सैनिकांचा हा चमू २४ तारखेला गोव्यामधील उच्चशिखर सोसोगडावर त्यानंतर २६ तारखेला कर्नाटकच्या मुलनगिरी शिखर, २७ तारखेला तमिळनाडूमधील दोटाबेटा पर्वतावर आणि २८ तारखेला केरळमधील अनामुरी शिखरावर हा चमू तिरंगा फडकावणार आहे. ही मोहीम अशीच पुढे सर्व २८ राज्यांत पोहचणार आहे. ऑक्टोबरमध्ये मोहिम ‘फत्ते’ होणार आहे.

..असा आहे साहसवीरांचा चमू
कर्नल रणवीर सिंह जामवाल, सुभेदार रवी देवडकर, तेसांग चोसगेल, हवालदार केवल, नेहपाल सिंह, राकेश यादव, नायक गणेश पाल, संजय कुमार, लोगु के., लोबसंग बापू, रूपक छत्री, थुटेन, राजा रामचिराय, समयाक राज मेहता असा १४ सैनिकांचा हा चमू आहे. या चमूने आतापर्यंत देशातील १४शिखरे लीलयापणे सर केली आहेत.
 

Web Title: Soldiers hoisted tricolor on 'Kalsubai' peak, 28 mountains of the country will be covered in 'Har Shikhar Triranga' campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.