नाशिक शहरात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:43 AM2017-11-14T01:43:38+5:302017-11-14T01:46:06+5:30

शहरातील पार्किंग आता स्मार्ट होणार असून, महापालिकेतर्फे त्यादृष्टीने पहिलाच प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली. बंगळुरू येथील पार्किंग व्यवस्थापन कंपनीमार्फत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्यात आली आहे. याच धर्तीवर शहरभर स्मार्ट पार्किंग साकारण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने निविदाप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला आहे.

Smart parking on experimental basis in Nashik city | नाशिक शहरात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग

नाशिक शहरात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग

Next
ठळक मुद्दे महापालिकेतर्फे पहिलाच प्रयोग निविदाप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ वाहनतळ हा शहराचा कळीचा प्रश्न

नाशिक : शहरातील पार्किंग आता स्मार्ट होणार असून, महापालिकेतर्फे त्यादृष्टीने पहिलाच प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली. बंगळुरू येथील पार्किंग व्यवस्थापन कंपनीमार्फत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्यात आली आहे. याच धर्तीवर शहरभर स्मार्ट पार्किंग साकारण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने निविदाप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला आहे.  शहरात वाहनांची संख्या वाढत चालली असली तरी पुरेसे वाहनतळ नसल्याने वाहने लावावी कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. शहरात अत्यंत मर्यादीत स्वरूपात महापालिकेने पे अ‍ॅँड पार्कची सुविधा दिली आहे. उर्वरित ठिकाणी वाहनतळ नसल्याने कोठेही वाहन उभे केले तर वाहन उचलून नेले जाते आणि वाहतूक पोलीस दंडही आकारतात. त्यापार्श्वभूमीवर वाहनतळ हा शहराचा कळीचा प्रश्न बनला आहे. वाहनतळांसाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यावर इतस्तत: उभ्या केल्या जाणाºया वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन, शहरवासीयांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात निवड झाल्यानंतर पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी एनएमएससीडीसी लि. कंपनीतर्फे शहरात ४१ ठिकाणी स्मार्ट पार्किंग उभारले जाणार आहे.  यामध्ये ३४ ठिकाणी रस्त्यांच्या कडेला, तर सात ठिकाणी खुल्या मैदानात स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम उभारली जाणार आहे. त्यातून वाहनतळांच्या जागेचा शोध व डिजिटल पेमेंटला चालना देण्याबरोबरच शहरातील पार्किंगच्या मालमत्तेत सुधारणा करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे सांगण्यात आले. 
पार्किंगची जागा शोधणे होणार सोपे 
या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचे पार्किंग सेन्सर, डॅश बोर्ड आणि सीसीटीव्ही कॅमेरे स्मार्ट पार्किंगच्या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहे. अत्याधुनिक सुधारणांनी प्रस्तावित ही स्मार्ट पार्किंगची सुविधा कॅशलेस असणार आहे. मोबाइल अ‍ॅपचा वापर करून वाहनचालकांना पार्किंगची जागा शोधणे सहजसोपे होणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी सांगितले.

Web Title: Smart parking on experimental basis in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.