‘स्मार्ट सिटी’साठी ठेकेदार मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:48 AM2018-12-21T01:48:52+5:302018-12-21T01:49:07+5:30

केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे, परंतु ठेकेदार मिळत नाही, अशी अवस्था गुरुवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत उघड झाली. स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासण्याचा आणि त्यासाठी शासकीय अभियांत्रिकी संस्थाची मदत घेण्याची देण्याची पडताळणी करण्याचे कंपनीच्या बैठकीत ठरविण्यात आले त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीच्या सर्व निविदा जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.

'Smart City' gets a contractor! | ‘स्मार्ट सिटी’साठी ठेकेदार मिळेना !

‘स्मार्ट सिटी’साठी ठेकेदार मिळेना !

Next
ठळक मुद्देकंपनीची बैठक : गुणवत्तेचे आता त्रयस्थ यंत्रणेमार्फत होणार आॅडिट

नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे, परंतु ठेकेदार मिळत नाही, अशी अवस्था गुरुवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत उघड झाली. स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासण्याचा आणि त्यासाठी शासकीय अभियांत्रिकी संस्थाची मदत घेण्याची देण्याची पडताळणी करण्याचे कंपनीच्या बैठकीत ठरविण्यात आले त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीच्या सर्व निविदा जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी (दि.२०) पार पडली. यावेळी विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. गावठाण विकास म्हणजे एबीडी रेट्रोफिटिंग एरियातील पाणीपुरवठा आणि सांडपाणी तसेच पायाभूत सुविधांसाठी शापूरची पालनची अ‍ॅण्ड कंपनीची एका निविदेची माहिती देण्यात आली.
‘स्मार्ट सिटी’त भरती
कंपनीला गळती लागल्याने कर्मचारी टिकत नसून गेल्या महिन्याच्या अखेरीस अवघे सहा कर्मचारी शिल्लक होते. त्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या प्राप्त आदर्श मनुष्यबळ धोरणासंदर्भानुसार ३८ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी कंपनीच्या लेखापरीक्षणासाठी मे. सी. आर. सागदेव आणि कंपनी यांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: 'Smart City' gets a contractor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.