येवल्यात कापड दुकान फोडुन सहा लाखाचा माल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 03:06 PM2017-12-27T15:06:32+5:302017-12-27T15:06:51+5:30

येवला- शहरातील विंचुर रस्त्यावर असलेल्या कापड दुकानात चोरट्यांनी कापड दुकानाचे शटर वाकवुन दुकानातील ५ लाख ९१ हजार ३५० रु पयांचा माल चोरून नेला.

A six-lakh worth of goods looted in Yeola city | येवल्यात कापड दुकान फोडुन सहा लाखाचा माल लंपास

येवल्यात कापड दुकान फोडुन सहा लाखाचा माल लंपास

Next

येवला- शहरातील विंचुर रस्त्यावर असलेल्या कापड दुकानात चोरट्यांनी कापड दुकानाचे शटर वाकवुन दुकानातील ५ लाख ९१ हजार ३५० रु पयांचा माल चोरून नेला. चेतन कासलीवाल यांचे शहरातील विंचुर रस्त्यावरील दामोदर कॉम्प्लॅक्स येथे युनायटेड १८ एनएक्स यानावाने रेडिमेड कपड्याचे दुकान आहे. कासलीवाल हे रात्री दहा वाजेचे सुमारास दुकान बंद करु न आपल्या घरी गेले. पहाटे कॉम्प्लॅक्समधील दुकानदार दुधेडीया यांनी कासलीवाल यांचे दुकानाचे शटर वाकवलेले पाहुन त्यांना चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ कासलीवाल यांना घटने बाबत कळविले. त्यानंतर चेतन कासलीवाल व त्यांचे बंधु अल्केश कासलीवाल यांनी तात्काळ दुकानात येवुन पाहिले तेव्हा दुकानातील शटर वाकवुन चोरट्यांनी आत प्रवेश करु न दुकानातील रेडिमेड पॅन्ट, शर्ट, जॅकेट इत्यादी असा ५ लाख ९१ हजार ३५० रु पयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरु न नेल्याचे लक्षात आले. सदर बाबत कासलीवाल यांनी येवला शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान, दुसºया एका घटनेत शहरातील भांडगे गल्लीत घराचा कोंडा तोडुन ६० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घराला कुलूप लावून बाहेर कामा निमित्त बाहेर असताÞना अज्ञात चोरट्यांनी घराचा कोंडा तोडुन घरातील कपाटाचा दरवाजा उघडुन कपाटातील साहित्यांची अस्थाव्यस्त करत ४५ हजारांचे सोन्याचे दागिने व १५ हजार रूपये रोख असा ६० हजारांचा ऐवज चोरीला गेला असल्याची फिर्याद वैशाली जितेंद्र पहिलवान यांनी शहर पोलिसाÞत दिली आहे. या बाबत अधिक तपास हवालदार सानप करीत आहे.

Web Title: A six-lakh worth of goods looted in Yeola city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक