सिन्नरला क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:18 AM2018-04-22T00:18:16+5:302018-04-22T00:18:16+5:30

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने प्रेरित नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ सातत्याने शैक्षणिक उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाने विद्यार्थ्यांमध्ये शारीरिकदृष्ट्या सक्षमता निर्माण व्हावी, मैदानाशी त्यांची नाळ जुळावी यासाठी मंडळाने सिन्नर संकुलात असणाऱ्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनीची सुरुवात केली.

Sinnar inaugurated sports academy | सिन्नरला क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन

सिन्नरला क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन

Next

सिन्नर : विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने प्रेरित नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ सातत्याने शैक्षणिक उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाने विद्यार्थ्यांमध्ये शारीरिकदृष्ट्या सक्षमता निर्माण व्हावी, मैदानाशी त्यांची नाळ जुळावी यासाठी मंडळाने सिन्नर संकुलात असणाऱ्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनीची सुरुवात केली.  सिन्नर संकुल प्रमुख श्रीपाद देशपांडे यांनी मैदानाचे उद्घाटन केले, तर मंडळाच्या क्रीडा प्रबोधिनी प्रमुख अलका कुलकर्णी आणि श्रीपाद देशपांडे यांच्या हस्ते क्रीडा प्रबोधिनी फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बापूसाहेब पंडित, प्राचार्य दिलीप वाणी, मुख्याध्यापक यशश्री कसरेकर, माया गोसावी, शिवराज सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. संकुलातील विविध शाळांचे क्रीडाशिक्षक जागृती टिळे, संजय चव्हाण, सुरेश शिंदे, संजय आरोटे, राजहंस माळी, सतीश गोर्डे, स्वप्निल महाले, दशरथ बिन्नर यांच्यासह अन्य तज्ज्ञ प्रशिक्षक शिबिर आयोजनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. क्रीडा प्रबोधिनी नामक उपक्रम सिन्नर संकुलात सुरू व्हावा आणि त्यातून उद्याचे भावी नागरिक शारीरिकदृष्ट्या सुदृढ तयार व्हावे म्हणून हा उपक्रम सुरू केला. शिबिर जरी अल्पकाळाचे असले तरी अव्याहतपणे वर्षभर संकुलात क्रीडाप्रेमींसाठी विविध कार्यक्रम, स्पर्धा, कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे सांगून शिबिरार्थी श्रीपाद देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या. सकाळी लवकर उठण्याची सवय लागली, सर्व खेळांचे नियम समजून घेण्यात मदत झाली अशी बोलकीप्रतिक्रिया पल्लवी चव्हाणके हिने व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमास सर्व क्रीडाशिक्षक, पर्यवेक्षक बाळासाहेब हांडे, अनिल पवार, राहुल मुळे, ऋषिकेश जाधव, प्रवीण  शिंदे, शिवाजी रेवगडे, तेजस पुराणिक यांनी उपस्थित होते.  सूत्रसंचालन सिन्नर संकुल क्रीडा प्रबोधिनी प्रमुख जागृती टिळे यांनी केले.

Web Title: Sinnar inaugurated sports academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा