सोशल मीडियातून शांततेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:25 AM2018-01-04T00:25:09+5:302018-01-04T00:27:04+5:30

नाशिक : हिंसाचाराचे प्रकार रोखण्यासाठी नेटिझन्सने सोशल मीडियातून महत्त्वाची भूमिका पार पाडली. राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून कलुषित झालेले वातावरण व जातीय तेढ कमी करण्यासाठी बुधवारी सोशल मीडियातून अनेकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला, तर अनेकांनी इंग्रजांची ‘तोडा आणि राज्य करा’ या नीतीची आठवण करून देत जातिभेद निर्माण करणाºयांचे आत्मभान जागविण्याचा प्रयत्न केला.

Silence appealed to social media | सोशल मीडियातून शांततेचे आवाहन

सोशल मीडियातून शांततेचे आवाहन

Next
ठळक मुद्देएकात्मतेचा संदेश : क्रांतिज्योती सावित्रीबार्इंचे स्मरण जातिभेद निर्माण करणाºयांचे आत्मभान जागविण्याचा प्रयत्न

नाशिक : हिंसाचाराचे प्रकार रोखण्यासाठी नेटिझन्सने सोशल मीडियातून महत्त्वाची भूमिका पार पाडली. राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून कलुषित झालेले वातावरण व जातीय तेढ कमी करण्यासाठी बुधवारी सोशल मीडियातून अनेकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला, तर अनेकांनी इंग्रजांची ‘तोडा आणि राज्य करा’ या नीतीची आठवण करून देत जातिभेद निर्माण करणाºयांचे आत्मभान जागविण्याचा प्रयत्न केला.
समाजात जातिभेद निर्माण करणाºयांचे आत्मभान जागविण्यासाठी नेटिझन्सनी बुधवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीची आठवण करून दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जीवनभर जातिभेद व सामाजिक रूढी-परंपरांना झुगारून महिला शिक्षणासाठी प्रयत्न केले. वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचविला. त्यांच्या जयंतीच्या दिवशीच शाळा बंद असल्याची आठवण करून देत जातीय तेढ संपविण्याचे आवाहन अनेकांनी सोशल मीडियातून केले, तर इंग्रजांनी भारतात जातिभेदाची बीजे पेरून सामाजिक तेढ निर्माण केली व तोडा व राज्य करा या नीतीने भारताला गुलाम बनविले. इंग्रजांनी केलेल्या जातीय भेदाभेदाच्या विषमय पेरणीचे परिणाम आजही देशाला भोगावे लागत आहेत. जातीय भेद व सामाजिक तेढ यामुळे कोणतीही जात विजयी होणार नाही, तर इंग्रज व त्यांची फोडाफोडीची रणनीतीच विजयी होईल, अशी चपराकही नेटिझन्सनी जातीय भेदाभेद पसरविणाºया समाजकंटकांना लगावली आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा सर्वांनीच आदर करून एकदिलाने नांदण्याचे आवाहनही सोशल मीडियातून अनेकांनी केले आहे, तर काहींनी केवळ शांतता राखा आपण सर्व एक आहोत, असे आवाहन करणारे संदेश सोशल मीडियातून व्हायरल केले.

Web Title: Silence appealed to social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.