भूदेवी, श्रीदेवी, बालाजी यांची शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:13 PM2018-10-13T23:13:41+5:302018-10-14T00:13:34+5:30

रामकुंडावरील चतु:संप्रदाय आखाडा श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने यंदाही शनिवारी (दि.१३) सायंकाळी भगवान बालाजी, श्रीदेवी व भूदेवी यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.

Shobha Yatra of Bhudevi, Sridevi, Balaji | भूदेवी, श्रीदेवी, बालाजी यांची शोभायात्रा

भूदेवी, श्रीदेवी, बालाजी यांची शोभायात्रा

Next
ठळक मुद्देभगवान बालाजी नवरात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्र म

पंचवटी : रामकुंडावरील चतु:संप्रदाय आखाडा श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने यंदाही शनिवारी (दि.१३) सायंकाळी भगवान बालाजी, श्रीदेवी व भूदेवी यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
शहरातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत साधू-महंत व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगवान बालाजी नवरात्रोत्सवनिमित्त बालाजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी चतु:संप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास यांच्या हस्ते भगवान बालाजी, श्रीदेवी व भूदेवी यांच्या मूर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर रथयात्रेला सुरु वात झाली. फुलांनी सजविलेल्या रथात भगवान बालाजी, श्रीदेवी व भूदेवी आदी देव-देवतांच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या होत्या. रामकुंड येथून निघालेली रथयात्रा पुढे कपालेश्वर मंदिरमार्गे गंगाघाट, गाडगे महाराज पुलाखालून मेनरोड, धुमाळ पॉइंट आदी परिसरातून काढण्यात आली. त्यानंतर चतु: संप्रदाय आखाडा येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. भगवान बालाजी नवरात्रोत्सव निमित्ताने दरवर्षी देव-देवतांना नगर भ्रमण केले जाते.

Web Title: Shobha Yatra of Bhudevi, Sridevi, Balaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.