चांदोरी येथे शिवशाहीची पिकअपला धडक, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 03:50 PM2019-05-22T15:50:25+5:302019-05-22T15:50:58+5:30

चांदोरी : येथे पूर्णकुटी क्रमांक दोनच्या समोर औरंगाबादच्या दिशेने जाणारी शिवशाही (एमएच १८, बीजी १६४४) व पिकअपमध्ये (एमएच १५, इजी ८४५९)यांच्यात अपघात झाला.

 Shivshahi's pick-up in Chandori hit the pick-up, injuring three people | चांदोरी येथे शिवशाहीची पिकअपला धडक, तिघे जखमी

चांदोरी येथे शिवशाहीची पिकअपला धडक, तिघे जखमी

Next

चांदोरी : येथे पूर्णकुटी क्रमांक दोनच्या समोर औरंगाबादच्या दिशेने जाणारी शिवशाही (एमएच १८, बीजी १६४४) व पिकअपमध्ये (एमएच १५, इजी ८४५९)यांच्यात अपघात झाला. या अपघातात शिवशाहीचे चालक किरकोळ जखमी तर पिकअपमध्ये असणारे विनित संजय उगलमूगले (डोंगरगाव, ता निफाड) हे गंभीर जखमी झाले. चांदोरी येथील पर्णकुटी क्र दोन समोर असलेल्या गतिरोधकावर नाशिक डाळिंब मार्केटवरु न येणारी पिकअप तसेच त्या मागोमाग येणारी नाशिकवरून औरंगाबादकडे जाणारी शिवशाही बस याच्या मध्ये सुमारे एक वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. पिकअप गतिरोधक वर हळू झाली असता वेगाने येणाऱ्या शिवशाहीची पिकअपला मागून जबरदस्त धडक बसली. धडक इतकी जोराची होती की पिकउप थेट तीन पलट्या घेत दुभाजकाच्या दुसर्या बाजूस जाऊन आदळली. या वेळी स्थानिक गोरख गडाख,भीमराव खरात,कैलास गडाख, मुकुंद जाधव, किसन खरात, ज्ञानेश्वर जाधव ,दत्तात्रय खरात तसचे मोटार वाहन निरीक्षक सुनील म्हेत्रे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून प्राथमिक उपचार केले. रु गवाहिका बोलवून जखमींना चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यामधील विनीत उगलमूगले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रु ग्णालय नाशिक येथे हलवण्यात आले आहे . शिवशाही बसमध्ये असलेले वाहक व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. पिकउप रस्त्यामध्ये पडलेली असल्याने तसचे मोठा प्रमाणात लोक जमल्याने वाहतूक कोडी झाली होती. नंतर सायखेडा पोलीस ठाणेच्या पोलीस कर्मचार्यांनी वाहतूक सुरळीत केली.

Web Title:  Shivshahi's pick-up in Chandori hit the pick-up, injuring three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक