घोटीच्या मित्र मंडळाची सातारा जिल्ह्यात शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 08:06 PM2019-03-26T20:06:22+5:302019-03-26T20:06:57+5:30

घोटी : येथील कळसुबाई मित्र मंडळाने सातारा जिल्ह्यातील लिंबा गावातील तीन मजली विहिरीला भेट देत रंगपंचमी साजरी केली.

Shiva Jayanti in Satara district of Ghoti's friend board | घोटीच्या मित्र मंडळाची सातारा जिल्ह्यात शिवजयंती

सातारा जिल्ह्यातील लिंबा गावात शिवजयंती व रंगपंचमी साजरी करताना कळसुबाई मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

Next
ठळक मुद्दे गडकिल्ल्यांवर सणवार साजरे करतात.

घोटी : येथील कळसुबाई मित्र मंडळाने सातारा जिल्ह्यातील लिंबा गावातील तीन मजली विहिरीला भेट देत रंगपंचमी साजरी केली.
इतिहासाचा वारसा जपण्यासाठी घोटीतील ट्रेकिंगवीर प्रत्येक उत्साहाच्या दिवशी वेगवेगळे उपक्र म राबवत असतात. विशेष म्हणजे हे सण आपल्या गावात अथवा घरी न साजरे करत घोटीतील ट्रेकिंगवीर इतिहासकालीन गड किल्ले यांचे संवर्धन व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत माहिती पोहचविण्याच्या उद्देशाने गडकिल्ल्यांवर सणवार साजरे करतात. त्याच पार्श्वभूमीवर घोटीचे ट्रेकिंगवीर भागीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली लिंबा गावातील तीन मजली विहिरीला भेट दिली.
या ऐतिहासिक तीन मजली बारामोटाच्या विहिरीला भेट देऊन तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजा करून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. याप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यानंतर दक्षिण काशी असलेल्या संगम माहुली गावाजवळील कृष्णानदी व वेण्णा नदीच्या संगमावर जाऊन राणी येसूबाई, राणी ताराराणी, शाहू महाराज यांच्या दुर्लक्षित समाधींचे पूजन केले. तळबीडला स्वराज्याचे सरसेनापती यांच्या समाधीचे पूजन केले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, अर्नाळा किल्ला, वसईचा किल्ला या जलदुर्गांवर जाऊन इतिहास आणि माहिती जाणून घेतली.
या प्रसंगी कळसुबाई मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, डॉ. महेंद्र आडोळे, बालाजी तुंबारे, गोकुळ चव्हाण, अशोक हेमके, बाळु आरोटे, प्रवीण भटाटे, निलेश पवार, प्रशांत जाधव, अभिजीत कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.
 

Web Title: Shiva Jayanti in Satara district of Ghoti's friend board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.