येवल्यात  शिवसेनेचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:49 PM2018-05-24T22:49:13+5:302018-05-24T22:49:13+5:30

येवला : विधान परिषदेच्या निवडणुकीत नरेंद्र दराडे विजयी झाल्याची वार्ता येवला शहर व तालुक्यात पोहचताच जल्लोष करण्यात आला. विधानसभेत छगन भुजबळ आणि आता विधान परिषदेत नरेंद्र दराडे असे दोन आमदार येवल्याला मिळाल्याने आतषबाजीसह गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप केले. ढोल-ताशाच्या गजरात व हलकडीच्या कडकडाटात झाला.

Shiv Sena's jolt in Yeola | येवल्यात  शिवसेनेचा जल्लोष

येवल्यात  शिवसेनेचा जल्लोष

googlenewsNext
ठळक मुद्देदराडे यांची विजयी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण

येवला : विधान परिषदेच्या निवडणुकीत नरेंद्र दराडे विजयी झाल्याची वार्ता येवला शहर व तालुक्यात पोहचताच जल्लोष करण्यात आला. विधानसभेत छगन भुजबळ आणि आता विधान परिषदेत नरेंद्र दराडे असे दोन आमदार येवल्याला मिळाल्याने आतषबाजीसह गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी मिठाई
वाटप केले. ढोल-ताशाच्या गजरात व हलकडीच्या कडकडाटात झाला. सायंकाळी विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  प्रारंभी विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. कार्यकर्त्यांनी दराडे यांच्या विजयाचा जल्लोष करत घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसर दणाणून गेला होता. दराडे सेनेत असले तरी त्यांचा संपर्क भुजबळांशी कायम राहिला आहे. २००४मध्ये विधानसभेत ओबीसी एकजूट कायम ठेवण्यासाठी दराडे यांनी एक पाऊल मागे घेतले होते. त्याची परतफेड भुजबळ यांनी केली, अशी चर्चादेखील आहे. दरम्यान, येवल्याला २५ वर्षांनंतर स्थानिक आमदार मिळाला असल्याचा आनंद आहे, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी म्हटले आहे. मिरवणुकीत सजवलेल्या वाहनावर भगवा फेटा परिधान करून नरेंद्र दराडे यांच्यासह शिवसेनेचे नेते संभाजी पवार व रामदास दराडे सहभागी झाले होते.

आमदार झाल्याने स्वप्न साकार

माझा भाऊ (नरेंद्र) मला आमदार म्हणून पाहायचा आहे, हे आईचे स्वप्न आज खरे झाले; परंतु त्या आज नाहीत. त्यांची आई कडक शिस्तीची. शेळीपालन व्यवसाय सांभाळत मुलांवर चांगले संस्कार करीत मोठे केले. गुण्यागोविंदाने आपला परिवार एकत्रित ठेवला. आईचे स्वप्न व आशीर्वाद आज सत्यात उतरले. यात परिवाराचे मोठे योगदान आहे. अवघा सारा परिवार एकत्रित आहे.दराडे यांचा जिल्ह्यात दांडगा संपर्कज्येष्ठ बंधू नरेंद्र दराडे यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करायचेच ही खुणगाठ बांधून कामाला लागलेले किशोर दराडे यांनी विधान परिषद हे लक्ष करीत कसमा पट्ट्यासह जिल्हाभरात दिवाळीभेट करीत जिल्ह्यातील सर्व नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी जवळीक साधली. येवला भेटीत येणारा जिल्ह्यातील प्रत्येक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य मतदार यांच्याशी केलेला प्रेमाचा व्यवहार यामुळे मतदारांच्या मनात दराडे यांनी घर तयार केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा अनुभव पाठीशी असल्याने जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले. स्वत:च्या शिक्षण संस्थेत असलेले विश्वासू सेवक यांचे सहकार्य, यातून झालेले सूक्ष्म नियोजन, एका एका मतदाराच्या संपर्कात असणारे कार्यकर्ते, त्या मतदाराच्या मानसिकतेचा अभ्यास, त्यातून नियमितपणे केलेले डॅमेज कंट्रोल फळास आले.

Web Title: Shiv Sena's jolt in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.