शिंदे टोलनाक्यावर बसप्रवासात सहप्रवाशाने चोरला मोबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:32 AM2018-06-30T00:32:19+5:302018-06-30T00:32:38+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा महागडा मोबाइल सहप्रवाशाने चोरून नेल्याची घटना शिंदे टोल नाका परिसरात घडली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी संशयित जगदीश लामाणी (२१, रा. राजाराम गल्ली, गोरेगाव वेस्ट, मुंबई) विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़

Shinde Cholla Mobile co-passes on a bus trip to TolaNak | शिंदे टोलनाक्यावर बसप्रवासात सहप्रवाशाने चोरला मोबाइल

शिंदे टोलनाक्यावर बसप्रवासात सहप्रवाशाने चोरला मोबाइल

Next

नाशिक : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा महागडा मोबाइल सहप्रवाशाने चोरून नेल्याची घटना शिंदे टोल नाका परिसरात घडली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी संशयित जगदीश लामाणी (२१, रा. राजाराम गल्ली, गोरेगाव वेस्ट, मुंबई) विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ नाशिकरोड पोलीस ठाण्यात इशान भालेराव (२७, रा. वाघुली, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री एक वाजेच्या सुमारास ते शिवशाही बसने (एमएच ०९, ईएम १९३१)पुण्याहून नाशिकला येत होते़ यावेळी सहप्रवासी असलेल्या संशयित लामाणी याने संगमनेर ते शिंदे टोल नाकादरम्यान भालेराव यांचा २५ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाइल चोरला़ या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी संशयित लामाणी यास अटक केली आहे़  मोबाइल चोरीची दुसरी घटना पंचवटीतील धनदाई लॉन्सजवळ घडली़ गोविंदनगर येथील सद्गुरू अपार्टमेंटमधील रहिवासी संजय खैरनार हे बुधवारी (दि़२७ जून) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास धनदाई लॉन्समध्ये गेले होते़ या ठिकाणी चोरट्यांनी त्यांचा ४४ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला़ या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तीन दुचाकींची चोरी
शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत़ मखमलाबाद येथील विद्यानगर येथील रहिवासी रोहित आवारे यांची २० हजार रुपये किमतीची हिरोहोंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५, बीएल ७३५६) रावसाहेब थोरात सभागृहाच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पंचवटीतील विमलनाथ प्राइडमधील रहिवासी रुचिका कुचेरिया यांची २५ हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, ईडब्ल्यू २०७०) चोरट्यांनी बीवायके कॉलेजच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बळीमंदिर चौकातील चक्रधरनगर येथील रहिवासी महेश ठाकरे यांची डिलक्स दुचाकी (एमएच ४१, एएच ७०२९) चोरट्यांनी श्याम सिल्व्हर अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ट्रकच्या बॅटºयांची चोरी
घराजवळ उभ्या केलेल्या ट्रकच्या दोन बॅटºया चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नाशिक-पुणे रोडवरील शिंदे गावात घडली़ शिंदे येथील पोपट गायधनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी आपला ट्रक (एमएच १५ एजी ३५७७) घराजवळ उभा केलेला होता़ चोरट्यांनी या ट्रकच्या कॅबिनमधील व ट्रकला लावलेल्या अशा दोन बॅटºया चोरून नेल्या़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shinde Cholla Mobile co-passes on a bus trip to TolaNak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.