शाहू महाराज यांनी उभे केले बहूजन समाज उत्थानाचे कार्य-संजय साळवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:06 PM2018-06-26T18:06:24+5:302018-06-26T18:11:25+5:30

उत्कृष्ठ प्रशासक, जनतेचा राजा व सर्वसामान्यांचा तारणहार असलेले राजर्षी शाहू महाराज यांची ओळख बहूजन समाजाच्या न्यायासाठी झटणारा लोकराजा अशी असून त्यांनीच या देशात बहूजन समाज उत्थानाचे कार्य उभे केले, असल्याचे प्रतिपादन प्रा. संजय साळवे यांनी केले.

Shahu Maharaj raised the work of Bahujan Samaj uplift - Sanjay Salve | शाहू महाराज यांनी उभे केले बहूजन समाज उत्थानाचे कार्य-संजय साळवे

शाहू महाराज यांनी उभे केले बहूजन समाज उत्थानाचे कार्य-संजय साळवे

googlenewsNext
ठळक मुद्देराजर्षी शाहू महाराज होते सर्वसामान्यांचा तारणहारसामाजिक न्याय दिन सोहळ्यात संजय साळवे यांचे प्रतिपादन

नाशिक : उत्कृष्ठ प्रशासक, जनतेचा राजा व सर्वसामान्यांचा तारणहार असलेले राजर्षी शाहू महाराज यांची ओळख बहूजन समाजाच्या न्यायासाठी झटणारा लोकराजा अशी असून त्यांनीच या देशात बहूजन समाज उत्थानाचे कार्य उभे केले, असल्याचे प्रतिपादन प्रा. संजय साळवे यांनी केले.
सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक यांच्यातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी (दि.२६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानित्त प्राचार्य व्ही.बी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेत सामाजिक न्याय दिन सोहळा साजरा करण्यातआला. व्यासपीठावर नाशिकच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्राची वाजे, विशेष अधिकारी देविदास नांदगांवकर, प्राचार्य विलास देशमुख, सहाय्यक संचालक दिपक बिरारी व वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीधर त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह्यशाहू महाराजांचे जीवन कार्यह्ण विषयावर व्याख्यान देताना प्रा.संजय साळवे यांनी महर्षी शाहू महाराज यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडून सांगतानाच त्यांच्या विचारांचे आजच्या समाजाना अनुकरण करण्याची गरज असल्या मत व्यक केले. ते म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य लक्षणीय असून बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या धेय्याने त्यांनी विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे काढून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्या सुरू केल्या. प्राथमिक शिक्षण आपल्या राज्यामध्ये सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा दक्षिण भारतात पहिल्यांदा शाहू महाराजांनीच केला असून समाजाच्या विकासासाठी तसेच दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शाहू महाराजांनी दाखवून दिलेल्या शिक्षण प्रसाराच्या वाटेवरच आपल्यालाही मार्गक्रमण करावे लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखीत केले. तर मिरवणुका व जयंत्यापुरते महापुरूषांच्या जयंती साजरे करणे थांबविले पाहिजे. महापुरूषांच्या विचारांचा अंगीकार करणेच खऱ्या अर्थाने महापुरूषांना अभिवादन ठरणारे असल्याचे मत समाज कल्याण महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमूख यानी व्यक्त केले. दरम्यान, आश्रमशाळेमधील दहावीत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. मनिषा शुक्ल यांनी केले. तर श्रीधर त्रिभूवन यांनी आभार मानले.

दिंडीच्या माध्यमातून समतेचा संदेश
सामाजिक न्याय दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून सकाळी काढण्यात आलेल्या समता दिंडीला अतिरिक्त जिल्हाधिकारी निलेश सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरु वात झाली. समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्यासह मावळ््यांची व सेवकांची वेशभूषा घेऊन समता दिंडीत सहभाग घेतला. दिंडीत एनएसएस, एनसीसी, शासकीय वसतिगृहाच्या मुली व परिसरातील विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: Shahu Maharaj raised the work of Bahujan Samaj uplift - Sanjay Salve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.