SG Intermediate Middle School student selected at the state level | एस.जी.इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्याची राज्य पातळीवर निवड
एस.जी.इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्याची राज्य पातळीवर निवड

सिन्नर : येथील एस. जी. पब्लिक स्कूल इंग्लिश मिडीयम या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध मैदानी स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. चंद्रशेखर सुभाष राजभर या विद्यार्थ्याची राज्यपातळीवर निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय झालेल्या गोळाफेक व थाळीफेक स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यी चंद्रशेखर राजभर याने अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकविला. त्याची राज्यपातळीवरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच येथील नवजीवन डे स्कूलमध्ये तालुकास्तरीय शालेय योगासने स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील वीस विद्यालय व पाच महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. योगप्रकारात एस. जी. पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूल मधील रोशनी नहार, साक्षी बोºहाडे, रिया सिंग, प्रतीक्षा धोक्रट, हंसा चंदेलिया, मानसी सिंग, निकिता घोटेकर,प्रतिमा चौधरी, अनुज मिश्रा, जय बहादूर, रणजीत यादव या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठीनिवड झाली आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक बी. आर. आरखडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब गडाख, दौलतराव मोगल, अभिषेक गडाख, प्राचार्य अनिता थोरात यांनी कौतुक केले.


Web Title: SG Intermediate Middle School student selected at the state level
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.