आॅनलाइन दस्त नोंदणीच्या कामाला सर्व्हरडाउनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:38 AM2018-01-30T01:38:28+5:302018-01-30T01:39:28+5:30

दुय्यम नोंदणी कार्यालयातील कामकाज गतीने पूर्ण व्हावे यासाठी शासनाने आॅनलाइन नोंदणीच्या सुविधा दिल्या खºया, परंतु सर्व्हरसह अन्य तांत्रिक सुविधा सक्षम नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, यापूर्वीच्या दस्त नोंदणीच्या तुलनेत निम्म्याच नोंदी होत असल्याने शासनाचेही नुकसान होत आहे.

Server drone registration server server crash | आॅनलाइन दस्त नोंदणीच्या कामाला सर्व्हरडाउनचा फटका

आॅनलाइन दस्त नोंदणीच्या कामाला सर्व्हरडाउनचा फटका

googlenewsNext

नाशिक : दुय्यम नोंदणी कार्यालयातील कामकाज गतीने पूर्ण व्हावे यासाठी शासनाने आॅनलाइन नोंदणीच्या सुविधा दिल्या खºया, परंतु सर्व्हरसह अन्य तांत्रिक सुविधा सक्षम नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, यापूर्वीच्या दस्त नोंदणीच्या तुलनेत निम्म्याच नोंदी होत असल्याने शासनाचेही नुकसान होत आहे.  दुय्यम निबंधकांकडे खरेदी आणि विक्रीच्या नोंदणीच्या क्रमवारीत बराच गोंधळ होत होता. तसेच संगणकीकरण असले तरी कामातही वेळ लागत होता. त्यामुळे राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून दस्त नोंदणी आॅनलाइन केली असून, त्यामुळे वेळेनंतर कोणतेही दस्त नोंदवले जाऊ शकत नाहीत. तथापि, गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हरडाउन सारख्या तांत्रिक अडचणी येत असून, त्यामुळे कामकाज अत्यंत संथगतीने सुरू आहे. विशेषत: बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचा वेळच नव्हे तर संपूर्ण दिवसच वाया जातो. यासंदर्भात तक्रारी करूनही उपयोग होत नाही. सोमवारी (दि.२९) असाच प्रकार घडला. डॉक्टर हाउसच्या पाठीमागील दुय्यम नोंदणी निबंधक कार्यालयात त्रस्त झालेले नागरिक वैतागले. काहींनी वकिलांसह दुय्यम निबंधक ठाकरे यांच्याकडे कैफियत मांडली. मात्र, सर्व्हरडाउनसारखी अडचण असेल तर आम्ही काय करू शकतो एवढेच एक उत्तर त्यांना ऐकायला मिळाले.

Web Title: Server drone registration server server crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक