सुटीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात गुपचूप वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:10 AM2018-09-23T01:10:30+5:302018-09-23T01:10:48+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानातील सुस्थितीतील जुन्या गुलमोहर झाडाची शासकीय सुटीच्या दिवशी सर्रासपणे कत्तल करण्यात आली असून, या वृक्षतोडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका व वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली होती काय, शिवाय उद्यानातील हा वृक्ष अनेकांना वर्षानुवर्षे सावली देण्याचे काम करीत असताना त्याची अडचण कोणाला व का झाली याविषयी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

 Secretly cut trees in the Collector's Office on the holidays | सुटीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात गुपचूप वृक्षतोड

सुटीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात गुपचूप वृक्षतोड

Next

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानातील सुस्थितीतील जुन्या गुलमोहर झाडाची शासकीय सुटीच्या दिवशी सर्रासपणे कत्तल करण्यात आली असून, या वृक्षतोडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका व वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली होती काय, शिवाय उद्यानातील हा वृक्ष अनेकांना वर्षानुवर्षे सावली देण्याचे काम करीत असताना त्याची अडचण कोणाला व का झाली याविषयी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.  विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक वृक्षाला संगोपनाच्या राख्या बांधण्यात प्रशासनच अग्रेसर होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील या उद्यानात अनेक जुने झाडे असून, जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या परगावच्या अभ्यागतांसाठी हे झाडे वर्षानुवर्षे सावली देण्याचे काम करीत आहेत. असे असताना शनिवारी यातील गुलमोहर जातीच्या झाडाची वृक्षतोड करणाºया कर्मचाºयांच्या मदतीने कत्तल करण्यात आली. प्रस्तुत प्रतिनिधीने याठिकाणी भेट देऊन विचारपूस करण्यास सुरुवात करताच, झाड तोडणाºया कर्मचाºयांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे सदरचे झाड तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची अनुमती घेतली होती किंवा नाही याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.  जर प्रशासनाच्या अनुमतीनेच झाडाची कत्तल केली असेल तर त्यासाठी शासकीय सुटीच्या दिवशी सदरचा प्रकार गुपचूप करण्याचे कारण काय? वृक्ष तोडीसाठी महापालिकेडे रितसर अर्ज केला होता काय, वृक्ष प्राधिकरण समितीने त्यास अनुमती देऊन झाड तोडीवर जनतेच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
एरव्ही पर्यावरणाचा -हास थांबविण्यासाठी कोट्यवधी वृक्ष लागवड केल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानणाºया प्रशासनानेच आपल्या आवारातील वृक्षांची कत्तल केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याबरोबरच वृक्षांप्रती असलेले बेगडी प्रेमही या निमित्ताने दिसून आले आहे. घरासमोरील वृक्षाचा अडथळा होत असल्यास नुसत्या फांद्या तोडल्या तरी नोटिसा व फौजदारी कारवाई करण्यास तत्पर असलेली नाशिक महापालिका व रस्त्याच्या मधोमध असलेल्या वृक्षांमुळे अपघात होत असतानाही वृक्षतोडीस विरोध करणारे वृक्षपे्रमी आता काय भूमिका घेतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

Web Title:  Secretly cut trees in the Collector's Office on the holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.