कंत्राटी कामगारांच्या वादावर पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:55 AM2018-06-19T00:55:09+5:302018-06-19T00:55:09+5:30

इंडियन टूल्स कंपनीतील कंत्राटी कामगारांकडून युनियनचा राजीनामा मागणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने मनसे युनियन पदाधिकाºयांना दिल्याने वादावर पडदा पडला आहे.

 The screen on the contract workers contract | कंत्राटी कामगारांच्या वादावर पडदा

कंत्राटी कामगारांच्या वादावर पडदा

Next

सातपूर : इंडियन टूल्स कंपनीतील कंत्राटी कामगारांकडून युनियनचा राजीनामा मागणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने मनसे युनियन पदाधिकाºयांना दिल्याने वादावर पडदा पडला आहे.  सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन टूल्स कंपनीतील २३० कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी व्यवस्थापनाविरोधात आंदोलन पुकारत मनसे कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे, तर कायम कामगारांची अखिल भारतीय मजदूर सभा ही युनियन आहे. एकाच कंपनीत दोन युनियन कार्यरत आहेत. कंत्राटदाराने कामगारांना पगार वाटप करताना मनसे युनियनचा राजीनामा देण्यासाठी धमकावले जात असल्याची तक्रार कामगारांनी पोलिसांत दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी कंत्राटदाराची कानउघाडणी केल्याचे कामगारांनी सांगितले. दरम्यान,अंकुश पवार, विजय अहिरे, अतुल पाटील यांच्यासह युनियन पदाधिकाºयांनी व्यवस्थापनाशी चर्चा केली.

Web Title:  The screen on the contract workers contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.