निंबाची वाडी प्राथमिक शाळेत लेक वाचवा, लेक शिकवा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 04:53 PM2019-02-11T16:53:05+5:302019-02-11T16:54:24+5:30

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील निंबाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ उपक्रमाची नुकतीच सांगता करण्यात आली.

Save Lake in Nimbalki Primary School, Lake Shikva Undertaking | निंबाची वाडी प्राथमिक शाळेत लेक वाचवा, लेक शिकवा उपक्रम

निंबाची वाडी प्राथमिक शाळेत लेक वाचवा, लेक शिकवा उपक्रम

Next

महिनाभरापासून सुरू असलेल्या या अभियानात शालेयअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रभातफेरीतून जनजागृती, बालिकादिन, महिलांसाठी हळदी-कुंकू, रांगोळी स्पर्धा, आरोग्यविषयक सवयींचे मार्गदर्शन, पालकभेटीतून पटसंख्या टिकवणे, सतत गैरहजर विद्यार्थ्यांना प्रवाहात आणणे आदी उपक्रम राबविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी चमचा लिंबू स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नाटिकेतून शाळेबद्दल आदर निर्माण करणे, थोर महिलांचे चरित्र व कार्य सांगणे आदी उपक्र मांतून ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष मारूती मेंगाळ, मुख्याध्यापक रंगनाथ थेटे, रामदास घुगे, प्रशांत हेकरे, संजय बोडके, अशोक साळवे, भरत शिरोळे, अविनाश खेडकर, वनिता साबळे उपस्थित होते.

Web Title: Save Lake in Nimbalki Primary School, Lake Shikva Undertaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.