सैनिकाच्या शिक्षक पत्नीला मिळणार मूळ जिल्ह्यात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 01:43 AM2019-03-11T01:43:19+5:302019-03-11T01:44:46+5:30

आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक पत्नीसाठी आंतरजिल्हा बदलीप्रकरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, अशा सैनिक शिक्षक पत्नीला आपल्या मूळ जिल्ह्यात आता बदली मिळणार आहे. जागतिक महिला दिनीच राज्याच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला असून, याचा लाभ राज्यातील २६ सैनिकांच्या शिक्षक पत्नींना होणार आहे.

Sainik's teacher changed his wife to the original district | सैनिकाच्या शिक्षक पत्नीला मिळणार मूळ जिल्ह्यात बदली

सैनिकाच्या शिक्षक पत्नीला मिळणार मूळ जिल्ह्यात बदली

Next

नाशिक : आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक पत्नीसाठी आंतरजिल्हा बदलीप्रकरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, अशा सैनिक शिक्षक पत्नीला आपल्या मूळ जिल्ह्यात आता बदली मिळणार आहे. जागतिक महिला दिनीच राज्याच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला असून, याचा लाभ राज्यातील २६ सैनिकांच्या शिक्षक पत्नींना होणार आहे.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांची आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात आलेली आहे. अशाप्रकरची बदली झाल्यानंतरही बदली झालेल्या शिक्षकाला गंभीर आजार, अपंगत्व या कारणास्तव मूळ जिल्ह्णात बदली मिळू शकते. याशिवाय एका जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविलेले असेल तर मूळ जिल्ह्णात पुन्हा परतता येते. आता यामध्ये आजी-माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी, विधवा यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. जे सैनिक देशासाठी सीमेवर संरक्षण करीत असतात अशा सैनिकांचे कुटुंब त्यांच्या मूळ गावीच असते असे नाही. त्यामुळे सैनिकांमध्ये कुटुंबीयांची चिंता असणे स्वाभाविक असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने जिल्हा परिषदेत शिक्षिका असलेल्या सैनिक पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीत मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील आजी-माजी सैनिकांच्या पत्नी या त्यांच्या मूळ जिल्ह्णाऐवजी अन्य जिल्ह्णात कार्यरत असल्यास अशा सैनिक पत्नीला आंतरजिल्हा बदलीने त्यांच्या मूळ जिल्हा परिषदेत जायचे असल्यास त्यांची तत्काळ त्यांच्या मूळ जिल्हा परिषदेत बदली करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत.
ज्या सैनिक पत्नी शिक्षिकेला कार्यमुक्त करण्यात आले त्यांची बदली ज्या जिल्हा परिषदेत होईल त्यांनी तत्काळ संबंधित शिक्षिकेला त्या जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या पदावर हजर करून घेतले पाहिजे, अशा सूचनाच जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या आहेत.
विशेष म्हणजे हजर करून घेताना जर त्या जिल्हा परिषदेमध्ये हजर होणाऱ्या शिक्षकास निवडीच्या प्रवर्गाचा बिंदू रिक्त असल्यास त्या बिंदूवर त्या शिक्षकाचे समायोजन करण्याचेदेखील आदेशित करण्यात आले आहे.
सैनिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न
ज्येष्ठ शिक्षक असल्यास त्याची प्रथम बदली केली जाते हा धोरणात्मक निर्णय आहे. अशी बदली झालेल्या ज्येष्ठ शिक्षकाला संबंधित ठिकाणी रिक्त जागा असो व नसो बदली क्रमप्राप्त ठरतो. त्यांना मूळ जिल्ह्णात परतता येत नाही. सैनिकाच्या शिक्षक पत्नीची अशा ज्येष्ठतेनुसार बदली झालेली असली तरी त्यांच्या मागणीनुसार त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्णात थेट बदली करणे अपेक्षित असल्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सैनिकांना आपल्या पत्नी आणि कुटुंबाची चिंता लागून राहू नये म्हणून त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्णात बदली देण्याचा हा निर्णय सैनिकांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Sainik's teacher changed his wife to the original district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.