शहरात शेकडो घरे, इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:05 AM2017-07-27T01:05:53+5:302017-07-27T01:06:06+5:30

नाशिक : तीस वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या विशेषत: लोड बेअरिंग पद्धतीच्या घरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने मागविलेल्या आॅडिटला आजवर कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

saharaata-saekadao-gharae-imaaratai-dhaokaadaayaka | शहरात शेकडो घरे, इमारती धोकादायक

शहरात शेकडो घरे, इमारती धोकादायक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तीस वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या विशेषत: लोड बेअरिंग पद्धतीच्या घरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेने मागविलेल्या आॅडिटला आजवर कोणताच प्रतिसाद मिळाला नसून त्यामुळे शेकडो इमारती धोकादायक असून, त्याची नोंद पालिकेकडे होऊ शकलेली नाही. केवळ पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या धोकादायक वास्तू आहेत अशा केवळ ४१० घरांचीच पालिकेकडे नोंद आहे. त्यामुळे नाशिककरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा कायम आहे.मुंबईत घाटकोपर येथे साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळून बारा जण ठार झाले. ही इमारत धोकादायक नव्हती. मात्र, तळमजल्यावर नर्सिंग होम सुरू करण्यात आले. त्यासाठी जे इमारतीत फेरबदल झाले, त्यामुळे हा सर्व प्रकार घडला. अशाप्रकारच्या धोेकादायक इमारती नाशिक शहरातही आहेत, परंतु त्याची कोणतीही नोंद महापालिकेकडे नाही. महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर पडके वाडे आणि काही इमारतींना धोकादायक ठरवून नोटीस दिली जाते. त्याचीच नोंद पालिकेकडे उपलब्ध आहे.  वास्तविक, शहरात आरसीसी आधी लोड बेअरिंग पद्धतीने बांधलेल्या तसेच तीस वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झालेल्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. त्यामुळेच महापालिकेने सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मुंबईत एक दुर्घटना घडल्यानंतर सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून आॅडिट करून तसे प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली. परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
महापालिकेने यात पुढाकार घेऊन शहरातील वास्तुशास्त्र महाविद्यालयांचा समावेश करून तीन एजन्सी घोषित केल्या. नागरिकांना स्ट्रक्चरल इंजिनिअरची शोधाशोध करावी लागू नये यासाठी ही व्यवस्था केली असली तरी त्यालाही आजवर प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेने लोडबेअरिंग पद्धतीच्या आणि आयुर्मर्यादा तीस वर्षांपेक्षा अधिक असलेल्या घरे आणि इमारतींच्या या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही उपाययोजना सुचविली ती आजवर फोल ठरली आहे. महापालिकेने संबंधितांना स्ट्रक्चरल आॅडिटची सक्ती न केल्याने नागरिकही याबाबत गाफील आहेत.
दरम्यान, मुंबईत ज्या पद्धतीने साईदर्शनमध्ये नर्सिंग होम सुरू झाले, त्याच धर्तीवर नाशिकमध्ये तळमजल्यावर मोडतोड करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. महापालिकेकडून त्याबाबत दखल घेतली जात नाही, अशी नागरिकांची ओरड आहे. केवळ विकासकच नव्हे तर इमारतीतील गाळेधारक किंवा सदनिकाधारक असे अनेक प्रकार करतात. परंतु त्याची फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही, असा नागरिकांचा अनुभव आहे.
सप्तशृंगी इमारतीच्या दुर्घटनेचा पूर्वानुभव
महापालिकेच्या नगररचना विभागाकडे बांधकाम परवानगी आणि पूर्णत्वाचा दाखला याखेरीज इमारतींची अन्य माहिती नसते.
८ जून २०११ मध्ये पंचवटीत तारवालानगर येथील श्री सप्तशृंगी अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर स्फोट झाला आणि ही इमारत उद्ध्वस्त झाली होती. त्यात तीन जण ठार आणि अकरा जण जखमी झाले होते. इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात फटाके तयार केले जात होते. त्याबाबत नागरिकांना आणि यंत्रणेला कोणतीही माहिती नव्हती. अशाच प्रकारे शहरातील अनेक इमारतींमध्ये रहिवासी किंवा विकासक ऐनवेळी तळमजल्यावर पिलर्सची मोडतोड करून किंवा वाहनतळाच्या जागेत गाळे बांधणे असे अनेक प्रकार घडल्याच्या तक्रारी येत असतात. परंतु महापालिकेकडून त्याची दखल घेतली जात नाही.

Web Title: saharaata-saekadao-gharae-imaaratai-dhaokaadaayaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.