आज ठरणार एसटी संघटनेची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:55 AM2018-01-19T00:55:26+5:302018-01-19T00:57:52+5:30

नाशिक : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीने वार्षिक १०७६ कोटींच्या प्रस्तावामध्ये वाढ करण्याऐवजी ती कमी करून वार्षिक ७४१ कोटींचा प्रस्ताव सादर केल्याने सदर प्रस्ताव एस.टी. कामगार संघटनेने फेटाळला आहे. यासंदर्भात शुक्रवार, दि. १९ रोजी मुंबईत होणाºया कृती समितीच्या बैठकीत पुढील रणनिती ठरणार असल्याने कृती समितीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Role of ST organization today | आज ठरणार एसटी संघटनेची भूमिका

आज ठरणार एसटी संघटनेची भूमिका

Next
ठळक मुद्देउच्चस्तरीय समितीच्या शिफारशी फेटाळल्याकृती समिती आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत

नाशिक : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीने वार्षिक १०७६ कोटींच्या प्रस्तावामध्ये वाढ करण्याऐवजी ती कमी करून वार्षिक ७४१ कोटींचा प्रस्ताव सादर केल्याने सदर प्रस्ताव एस.टी. कामगार संघटनेने फेटाळला आहे. यासंदर्भात शुक्रवार, दि. १९ रोजी मुंबईत होणाºया कृती समितीच्या बैठकीत पुढील रणनिती ठरणार असल्याने कृती समितीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वेतनवाढीच्या मुद्दावर एस.टी. कामगार संघटनेसह कृती समितीत सहभागी असणाºया संघटनांनी चार दिवसांचा संप पुकारला होता. या संपाला एस.टी. महामंडळाने न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने कामगार हिताचा मुद्दा उपस्थित करीत वेतनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार समिती स्थापन होऊन समितीने वेतनवाढीचा मसुदा तयार केला आहे. वास्तविक यापूर्वी महामंडळाने १०७६ कोटींचा दिलेला प्रस्ताव नाकारून वेतनवाढीसाठी संप पुकारला होता. मात्र, उच्चस्तरीय समितीने त्यात आणखी कपात करून ७४१ कोटींचा प्रस्ताव सादर केल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. संघटनेच्या राज्यकार्यकारिणीच्या बैठकीत सदर प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. आता पुढील बैठक दि. १९ रोजी होत असून, त्यात होणारा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर नाराजी व्यक्त करताना संघटनेच्या वतीने सदर अहवाल निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने देऊ केलेले २.५७ च्या सूत्राऐवजी २.३७ चे सूत्र उच्चस्तरीय
समितीने दिले आहे. वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्यांऐवजी २ टक्के, घरभाडे १०
टक्क्यांऐवजी ७ टक्के, २० टक्क्यांऐवजी १४ टक्के, ३० टक्क्यांऐवजी २१ टक्के केला आहे. या प्रस्तावामुळे कर्मचाºयांच्या एकूण वेतनात केवळ १०.५ टक्के इतकीच वाढ सुचविण्यात आली आहे. त्यामुळे सदर प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे पत्रक कामगार संघटनेने काढले आहे. निराशा करणारा अहवाल
शासकीय कर्मचाºयांप्रमाणे एस.टी. कर्मचाºयांचे वेतन होण्यासाठी दिलेल्या प्रस्तावावर संघटनेशी चर्चा न करता एकतर्फी वेतनवाढीचा प्रस्ताव दिला असून, ही वाढ अपेक्षित नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. कर्मचाºयांच्या हितासाठी वेतनाचा लढा सुरूच राहील.
- विजय पवार, विभागीय अध्यक्ष,
एस.टी. कामगार संघटना

Web Title: Role of ST organization today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.