रोजगारनिर्मितीत लघुउद्योजकांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:21 AM2017-10-31T01:21:18+5:302017-10-31T01:21:24+5:30

देशात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या असून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात लघुउद्योगांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे लघु व मध्यम उद्योग मंत्रालय प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी केले आहे.

The role of small business entrepreneurs is important | रोजगारनिर्मितीत लघुउद्योजकांची भूमिका महत्त्वाची

रोजगारनिर्मितीत लघुउद्योजकांची भूमिका महत्त्वाची

googlenewsNext

नाशिक : देशात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या असून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात लघुउद्योगांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे लघु व मध्यम उद्योग मंत्रालय प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी केले आहे.
नाशिक इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे मेक इन नाशिक अंतर्गत गेट वे हॉटेल अंबड येथे वेंडर डेव्हलपमेंट शिबिराचे अनंत गिते यांच्या हस्ते सोमवारी (दि.३०) उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, हरिशंकर बॅनर्जी, रामाशिष भुतडा आदी उपस्थित होते.  गिते म्हणाले, मेक इन इंडियाला बळ देण्यासाठी मेक इन नाशिकची निर्मिती करण्यात आली असून, देशातील औद्योगिक स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी मेक इन नाशिकची महत्त्वाची भूमिका आहे. देशातील मोठ्या उद्योगांसोबतच लहान व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांच्या विकासावर देशाचे अर्थकारण अवलंबून आहे. या उद्योगांमधील स्पर्धेसोबतच गुणात्मक वाढ होणे अपेक्षित असून, स्पर्धात्मक वाढ ही औद्योगिक विकासाला पोषक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.  गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तोट्यात असलेल्या भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (बीएचइएल) ला तोट्यातून बाहेर काढण्यात सरकारला यश आले असून, अन्य उद्योगक्षेत्राच्या विकासासाठी मेक इन इंडिया अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे गिते यांनी सांगितले. 
विमानसेवेवरून भाजपाला टोला 
नाशिकमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू असून, सप्टेंबरपर्यंत ही सेवा सुरू होणे अपेक्षित असताना या विमानसेवेसाठी लागणारा टाइमस्लॉट गुजरातसाठी वळविण्यात आला. त्यामुळे नाशिकसह अन्य विमानतळावरून उड्डाण होऊच शकले नाही. नाशिकसह अन्य कंपन्यांचा टाइमस्लॉट हा गुजरातमधील कांडला, सुरत, पोरबंदर या विमानतळांना देण्यात आला. त्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला पुन्हा घरघर लागून प्रस्तावित उडान योजनेचाच बोजवारा उडाला. यावर भाष्य करताना अनंत गिते यांनी गुजरातचे तसेच भाजपाचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या भाजपा व केंद्र सरकारला टोला लगावला.

Web Title: The role of small business entrepreneurs is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.