नदी, नाल्यांभोवती बांबूची लागवड करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:20 AM2019-07-02T01:20:45+5:302019-07-02T01:21:22+5:30

महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत कृषी दिनानिमित्त महानगरपालिका क्षेत्रात सव्वा सहा कोटी रुपये खर्च करून पन्नास हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याने त्याची सुरुवात मंगळवारी सकाळी उंटवाडी स्मशानभूमीजवळ, सिडको येथे महापौर रंजना भानसी व आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आली.

 River, planting bamboo around Nala | नदी, नाल्यांभोवती बांबूची लागवड करणार

नदी, नाल्यांभोवती बांबूची लागवड करणार

Next

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत कृषी दिनानिमित्त महानगरपालिका क्षेत्रात सव्वा सहा कोटी रुपये खर्च करून पन्नास हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याने त्याची सुरुवात मंगळवारी सकाळी उंटवाडी स्मशानभूमीजवळ, सिडको येथे महापौर रंजना भानसी व आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आली. शहरातील नद्या व नाल्याचे पुनर्जीवित करून प्रदूषण रोखण्यासाठी बांबूची लागवड करण्यात येणार आहे.
ज्याप्रमाणे देवराई वृक्षलागवड केली जाणार आहे, तशीच लागवड महापालिकांच्या मोकळ्या जागा, क्रीडांगण, इमारतींभोवतीची जागा अशा ठिकाणी देशी झाडे लावण्यात येणार आहेत.
यावेळी सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, प्रभाग समिती सभापती हर्षा बडगुजर, नगरसेवक सुधाकर बडगुजर, श्यामकुमार साबळे, भाग्यश्री ढोमसे, उपायुक्त प्रशासन सुनीता कुमावत, उद्यान व वृक्षप्राधिकरण उपायुक्त शिवाजी आमले, उपअभियंता महेश तिवारी, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, भारतीय स्टेट बँक अधिकारी सुधीर भागवत, कृष्ण निरंजन, विनोद कुमार, यज्ञेश झवर, संदीप इमदे, विनोद मराठे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशी प्रजातीची झाडे लावणार
या वृक्षलागवडीत यंदा प्रथमच प्रामुख्याने शहरातील गोदावरी नदी, नंदिनी, वालदेवी नदी, नाले यांच्या काठांवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे. नदी-नाल्यांच्या काठावर बांबूची लागवड केली जाऊन जैवविविधा टिकवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यात सामाजिक संस्थांना सहभागी करून घेतले जाणार आहे. तसेच यंदा प्रामुख्याने देशी प्रजातीची झाडे लावण्यावर भर दिला जाणार आहे.

Web Title:  River, planting bamboo around Nala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.