Revelations of two thieves in Nashik: In one day, five incidents were revealed in the same day | नाशकात दुचाकी चोरांचा सुळसुळाट ; एकाच दिवसात पाच घटना उघड
नाशकात दुचाकी चोरांचा सुळसुळाट ; एकाच दिवसात पाच घटना उघड

ठळक मुद्देनाशिक शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाटपोलिस विभागाला दुचाकी चोरांचे आव्हान दिवसेंदिवस वाहन चोरीच्या प्रमाणात वाढ

नाशिक :  शहराच्या विविध भागातून पाच मोटार सायकल चोरीच्या घटना घडल्याचे एकाच दिवशी उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठण्याच्या हद्दीतून एक, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, मुंबईनाका एक व  पंटवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण  पाच  दुचाकी वेगवेगळ््या दिवशी चोरीला गेल्या असून गुरुवारी (दि.१४) या प्रकरणी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शहरात दिवसेंदिवस मोटार सायकल चोरांचा सुळसुळाट वाढला असून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेसमोर आव्हाण उभे केले आहे. पंचवटीतील पेठफाटा  परिसरातील म्हाडा इमारतीच्या पार्कींगममधून बुधवारी (दि.१३) साडेनऊ वाजेपासून ते गुरुवारी सात वाजेपर्यंतच्या काळात अंदाजे १४ हजार रुपये किंमतीची मोपेड दुचाकी क्रमांक एमएच १५ सीयू १३१९ चोरीला गेली. याप्रकरणी  दिलीप पुंडलीक चौधरी यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्याच चोरीच्या गुन्ह्याची  नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना ठक्कर बाजार बसस्थानकाच्या पार्कींगमध्ये घडली, येथून एमएच१५ डीए २५७६ क्रमांकाची काळ््या रंगाची मोटार सायकल चोरीला गेल्याची फिर्याद कुणाल चंद्रकांत उबाळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना अशोका मार्ग परिसरात स्वरा डेंटल क्लिनिकजवळ घडली. येथे.  सोमवारी (दि.११) सायंकाळी सहा ते  मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी  एमएच१५ जीक्यू०४१६ क्रमांकाची ६० हजार रुपये किंमतीची मोपेड दुचारी चोरून नेली. याप्रकरणी योगेश अंबादास शेलार यांनी  मुंबई नाका पोलीस ठाण्यात   दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर   अंबड परिसरता दोन मोटार सायकली चोरीला गेल्या असून मंगळवारी (दि.१२) मोरवाडीतील दत्तमंदीराजवळून एमएच१५ एएल ४३३७ क्रमांक ाची व  दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी सुनील तुकाराम कातकाडे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरी घटना सिडकोच्या त्रीमूर्ती चौक परिसरातील दुर्गामाता मंदीरामागील बाजूस घडली. येथे एमएच१५ ईयू १९९१ क्रमांकाची   १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी उभी असताना अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी सुरज शिवदास शिरसाठ यांनी फिर्याद दिली असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Web Title: Revelations of two thieves in Nashik: In one day, five incidents were revealed in the same day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.