विद्यार्थ्यांकडून सैनिकांना राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 02:16 PM2018-08-16T14:16:06+5:302018-08-16T14:16:30+5:30

पाथरे : प्रिय सैनिक दादा, तू देश रक्षणासाठी, आमच्यासाठी ऊन, वारा,पावसात पहारा देतोस. तुला सण,उत्सव,समारंभ साजरे करता येत नाही. मला तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो. तू सीमेवर सतत जागा असतोस म्हणून आम्ही निवांत झोपतो. मी तुझी लहान बहीण तुला प्रेमाचं प्रतीक हा धागा पाठवत आहे.त्याचा तू स्वीकार कर. कधी जर इकडे आलास तर मला अवश्य भेट. यासारखे संदेश लिहून आणि राख्या बनवून भारतीय सैनिकांना सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व एस.जी.कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाठवल्या.

Researchers from the students | विद्यार्थ्यांकडून सैनिकांना राख्या

विद्यार्थ्यांकडून सैनिकांना राख्या

Next

पाथरे : प्रिय सैनिक दादा, तू देश रक्षणासाठी, आमच्यासाठी ऊन, वारा,पावसात पहारा देतोस. तुला सण,उत्सव,समारंभ साजरे करता येत नाही. मला तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो. तू सीमेवर सतत जागा असतोस म्हणून आम्ही निवांत झोपतो. मी तुझी लहान बहीण तुला प्रेमाचं प्रतीक हा धागा पाठवत आहे.त्याचा तू स्वीकार कर. कधी जर इकडे आलास तर मला अवश्य भेट. यासारखे संदेश लिहून आणि राख्या बनवून भारतीय सैनिकांना सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व एस.जी.कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाठवल्या. यानिमित्ताने विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सध्या भारतीय सेनेत असलेले जवान विजय तासकर, प्रमोद गोडगे, अनिल नरोडे यांना विद्यार्थीनींनी राख्या बांधल्या आणि संदेश वाचून दाखवले. यावेळी प्रमोद गोडगे यांनी आपल्या देशाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आण िसर्व राख्या व संदेश बरोबर घेवून जाण्याचे आश्वासन दिले. विद्यालयाच्या ६९० विद्यार्थ्यांनी अहोरात्र कर्तव्य पार पाडणाऱ्या भारतीय जवानांना विद्यार्थ्यांनी स्वत: सुंदर राख्या बनवून आणि संदेश लिहून पाठवले. विद्यालयात राख्या बनवण्याची कार्यशाळाही आयोजित केली होती. या सर्व राख्या व संदेश आर्टिलरी सेंटर नाशिकला पाठवल्या जाणार आहे तर काही राख्या ह्या सैनिकांबरोबर पाठवल्या जाणार आहे.तेथून त्या सीमेवर रवाना होतील व जवानांना वितरीत केल्या जातील. उपक्र म यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनील गडाख, पर्यवेक्षक नामदेव कानसकर, शमीरुल्ला जहागीरदार, सलीम चौधरी, रमेश रौदळ, बाळासाहेब कुमावत, बाळासाहेब खुळे, जगदीश बडगुजर, रविंद्र कोकटे, राजेंद्र गवळी, नारायण वाघ, नवनाथ पाटील, नितीन जगताप,बाळासाहेब गुरु ळे, अलका कोतवाल, मंगला बोरणारे, सुमती मेढे, बरखा साळी, मेधा शुक्ल, विश्वनाथ ठोक, सुरेखा गुरु ळे,सचिन रानडे, सुनील तासकर, जगन शिंदे आदींसह विद्यार्थी प्रयत्नशील होते. 

Web Title: Researchers from the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक