निवेदन : बिटको-नांदूरनाका मार्ग बनला मृत्यूचा सापळा; चौफुलीवर सिग्नल बसविण्याची मागणी जेलरोड भागात अवजड वाहनांमुळे अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:09 AM2018-02-11T01:09:09+5:302018-02-11T01:09:35+5:30

नाशिकरोड : बिटको ते नांदूरनाका जेलरोड हा वाहनांच्या वाहतुकीमुळे मृत्यूचा सापळा बनला असून, वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Request: Bitco-Nanduranaka becomes the road to death; Accidental accidents increase due to heavy vehicles in the Jail Road area demanding a signal on the aisle | निवेदन : बिटको-नांदूरनाका मार्ग बनला मृत्यूचा सापळा; चौफुलीवर सिग्नल बसविण्याची मागणी जेलरोड भागात अवजड वाहनांमुळे अपघातांत वाढ

निवेदन : बिटको-नांदूरनाका मार्ग बनला मृत्यूचा सापळा; चौफुलीवर सिग्नल बसविण्याची मागणी जेलरोड भागात अवजड वाहनांमुळे अपघातांत वाढ

Next
ठळक मुद्देजेलरोड रस्त्यावर अनेक शाळाअपघातात निष्पाप नागरिकांचे बळी

नाशिकरोड : बिटको ते नांदूरनाका जेलरोड हा अनधिकृतरीत्या होणाºया अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे मृत्यूचा सापळा बनला असून, जेलरोडवरून अवजड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जेलरोड इंगळेनगर येथे सोमवारी हेल्मेटधारी दुचाकीचालक प्रवीण कुमट या व्यापाºयाचा बाराचाकी ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत भारतीय विद्यार्थी सेना व पीपल्स रिपाइंच्या वतीने सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेलरोड रस्त्यावर अनेक शाळा, महाविद्यालय, खासगी क्लासेस व चलार्थ प्रतिभूती मुद्रणालय असल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत विद्यार्थी व कामगारांची मोठी रेलचेल असते. यापूर्वी जेलरोडवर झालेल्या अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. निवेदनावर भारतीय विद्यार्थी सेनेचे गणेश गडाख, श्रीकांत मगर, शिवाजी भोर, अजिंक्य गायधनी, मंगेश बांगर, अक्षय कदम, आकाश ढोले, अमित बागुल, राहुल सानप, सागर वानखेडे, जावेद शेख व पीपल्स रिपाइंच्या निवेदनावर शशिकांत उन्हवणे, संदीप काकळीज, बिपीन मोहिते, नवनाथ कातकाडे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Request: Bitco-Nanduranaka becomes the road to death; Accidental accidents increase due to heavy vehicles in the Jail Road area demanding a signal on the aisle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.