रस्ता दुरवस्थेबाबत छावणी अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:55 PM2019-01-22T23:55:06+5:302019-01-23T00:06:40+5:30

छावणी परिषदेच्या वार्ड क्रमांक ४ मधील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून, काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 Report to the camp authorities about the road disturbance | रस्ता दुरवस्थेबाबत छावणी अधिकाऱ्यांना निवेदन

रस्ता दुरवस्थेबाबत छावणी अधिकाऱ्यांना निवेदन

Next

देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या वार्ड क्रमांक ४ मधील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून, काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मधोमध खोदाई करण्यात आल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ज्या परिसरात भूमिगत गटारांचे काम पूर्ण झाले त्या ठिकाणच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अनिता गोडसे, व्यापारी बँकेचे संचालक अरुण जाधव, कैलास गोडसे, संजय जाधव, राजेश धुर्जड, सुनील चव्हाणके, राहुल धुर्जड, अनिल जाधव, सचिन धुर्जड, नितीन जाधव, जयेश गोडसे, तेजस शेळके आदींच्या सह्या आहेत.

Web Title:  Report to the camp authorities about the road disturbance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक