जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन बंधाºयांचा गाळ काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:40 AM2019-02-08T00:40:01+5:302019-02-08T00:40:52+5:30

नाशिक : जिल्ह्यात ब्रिटिशकालीन वळण बंधाºयातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि युवामित्र संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यानुसार आठ तालुक्यांत १४२ गावांतील ७१ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. बंधाºयातील गाळ काढल्यानंतर साचणाºया पाण्यातून ५५ हजार एकर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार आहे.

To remove the sludge of the British-based bondage in the district | जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन बंधाºयांचा गाळ काढणार

जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन वळण बंधाऱ्यांतील गाळ काढण्याच्या करारावर सह्या केल्याप्रसंगी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्, युवा मित्रचे सुनील पोटे व अन्य अधिकारी.

Next
ठळक मुद्देकरार : आठ तालुक्यांत खासगी संस्थांची घेणार मदत

नाशिक : जिल्ह्यात ब्रिटिशकालीन वळण बंधाºयातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि युवामित्र संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यानुसार आठ तालुक्यांत १४२ गावांतील ७१ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. बंधाºयातील गाळ काढल्यानंतर साचणाºया पाण्यातून ५५ हजार एकर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. आणि युवामित्रच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक सुनील पोटे यांनी या करारावर स्वाक्षºया केल्या. आतापर्यंत २६ वळणबंधाºयातील गाळ काढल्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढील टप्प्यात १७० वळणबंधाºयांतील गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी ३१ जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, ही संख्या ७०पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
गाळ काढण्यासाठी ५० टक्के खर्च शासन, ४१.९ टक्के खर्च टाटा ट्रस्ट व इतर संस्था आणि ८.१ टक्के खर्च लोकसहभागातून करण्यात येणार आहे. गाळ काढण्याबरोबर पीक पद्धतीत अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिकांचेदेखील या कामात सहकार्य घेण्यात येणार आहे. भविष्यात पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी पाणीवापर संस्था स्थापन करण्यावरही भर देण्यात येणार आहे. गाळ काढण्याच्या कामात ग्रामस्थांचे सहकार्य मिळावे यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. यावेळी टाटा ट्रस्टचे कार्यक्रम व्यवस्थापक मुकुल गुप्ते, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, युवामित्र संस्थेचे, कार्यक्रम व्यवस्थापक अजित भोर आदी उपस्थित होते.विविध बंधारेगाळ काढण्याच्या या टप्प्यात बागलाण तालुक्यात ३५ गावांतील ४० बंधारे, चांदवड तालुक्यात ३२ गावातील ३९, दिंडोरी १० गावांतील १३, कळवण २१ गावातील २४, मालेगाव १३ गावातील १३, नाशिक १ तालुक्यातील २, निफाड २२ गावांतील २५ आणि सिन्नर तालुक्यात ८ गावांतील १४ बंधाºयांचा यात समावेश आहे.

Web Title: To remove the sludge of the British-based bondage in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.