महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने  ३० कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:08 AM2019-03-28T00:08:35+5:302019-03-28T00:08:52+5:30

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची धडक वसुली मोहीम सुरू असून, मंगळवारपर्यंत (दि.२६) घरपट्टीची २१ कोटी ५० लाख व पाणीपट्टी ८ कोटी ५० लाख अशी एकूण ३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

Recovery of 30 crores on behalf of Municipal Corporation's CIDCO departmental office | महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने  ३० कोटींची वसुली

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने  ३० कोटींची वसुली

Next

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची धडक वसुली मोहीम सुरू असून, मंगळवारपर्यंत (दि.२६) घरपट्टीची २१ कोटी ५० लाख व पाणीपट्टी ८ कोटी ५० लाख अशी एकूण ३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत थकबाकी असणाऱ्या शंभरहून अधिक थकबाकीदारांना मनपाच्या वतीने वॉरंट बजाविण्यात आले असून, मुदतीनंतरही थकबाकी न भरणाऱ्यांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित ९७ हजार ८७९ मिळकतधारक आहे. यंदाच्या वर्षी वरिष्ठांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयास घरपट्टीचे ४६ कोटी ३५ लाख, तर पाणीपट्टीचे २० कोटी ८० लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. घरपट्टी व पाणीपट्टीचे मिळून ६७ कोटी १४ लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी मिळकतधारकांना नोटिसा बजाविण्यात आला आहेत. तसेच ५० हजार रुपयांपर्यत थकबाकी असणाºया शंभराहून अधिक थकबाकीदारांना वॉरंट बजाविण्यात आले असून, यानंतर २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदत दिल्यानंतरही थकबाकी न भरल्यास थकबाकीदारांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव काढण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. घरपट्टीच्या ४६ कोटी ३५ लाख उद्दिष्टापैकी मंगळवारपर्यंत (दि.२६) सुमारे २१ कोटी ५० लाख इतकी वसुली झाली, तर पाणीपट्टीच्या २० कोटी ८० लाख उद्दिष्टापैकी ८ कोटी ५० लाख इतकी वसुली झाली आहे. एकूणच घरपट्टी व पाणीपट्टी मिळून ३० कोटी इतकी वसुली झाली आहे.
जप्तीची कारवाई
मार्चअखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपाकडून थकबाकीदारांना तगादे लावण्यात येत असून, यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली मोहीम सुरू.
महापालिकेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी धडक वसुली मोहीम सुरू आहे. वरिष्ठांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत थकबाकी असणाºया शंभराहून अधिक थकबाकीदारांना वॉरंट बजाविण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेल्या मुदतीच्या आत थकबाकी भरून कारवाई टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.  - डॉ. सुनीता कुमावत, विभागीय अधिकारी, मनपा सिडको विभाग

Web Title: Recovery of 30 crores on behalf of Municipal Corporation's CIDCO departmental office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.