लासलगावला कांद्याच्या भावामध्ये विक्रमी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:24 AM2018-01-30T01:24:50+5:302018-01-30T01:25:14+5:30

कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये वाढलेली मोठी आवक यामुळे लासलगावच्या कांदा बाजारामध्ये सोमवारी सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे.

Record fall on Lashkar-ka onion brother | लासलगावला कांद्याच्या भावामध्ये विक्रमी घसरण

लासलगावला कांद्याच्या भावामध्ये विक्रमी घसरण

Next

लासलगाव : कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये वाढलेली मोठी आवक यामुळे लासलगावच्या कांदा बाजारामध्ये सोमवारी सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे.  केंद्र सरकारने मागील सप्ताहामध्येच कांद्याच्या किमान निर्यात मूल्यामध्ये कपात केल्याची घोषणा केली होती. सध्या श्रीलंका वगळता इतर देशांमध्ये कांदा निर्यात थंडावलेली आहे.तसेच लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची राज्यभरातील सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा सुमारे तिप्पट आवक होत आहे.  याशिवाय गुजरातसह मध्य प्रदेश व इतर राज्यांत होत असलेली कांदा आवक याचा संयुक्त परिणाम महाराष्ट्रातील लासलगाव सह विविध बाजारपेठांमध्ये जाणवत आहे. कांदा भावात वेगाने घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.  मागील सप्ताहात मंगळवारनंतर लासलगावला सोमवारी (दि. २९) कांद्याचे लिलाव झाले.मागील बंद भावाच्या तुलनेत सोमवारी किमान भावात ६००, कमाल भावात ७५२ तर सरासरी भावात नऊशे रूपये प्रतिक्विंटल घसरण झाली . सोमवारी लिलावात किमान ९०० , कमाल भाव २४०० तर सरासरी १९५१ रूपये भाव जाहीर झाला.  सरासरी भाव कमी झाल्याने कांद्याचा उत्पादन खर्चही भरून निघणारा नाही . त्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  या सप्ताहात गुजरात बरोबरच मध्य प्रदेश सह इतर राज्यांत नवीन कांदा बाजारपेठेत दाखल झाल्याने महाराष्ट्रातील तेजीत असलेल्या कांद्याची मागणी कमी झाली. सोमवारपासून कांदा भावात कमालीची घसरण झाली. जोरदार थंडी आणि पोषक हवामान यामुळे कांदा एकरी उत्पादन चांगले येत आहे. .तसेच पुणे, लोणंद व अहमदनगर भागातील कांदा बाजारपेठेत तिप्पट आवक होत आहे. 
 गुजरात बरोबरच महाराष्ट्रात पुणे , लोणंद ,जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरसह सर्व आवारात अधिक कांदा आवक वाढलेली आहे. त्याचा परीणाम म्हणून आता कांदा भाव घसरण झाल झाली आहे. उन्हाळ कांदा मार्च महीन्यात बाजारपेठेत दाखल होईल . - नितीन जैन, कांदा व्यापारी, लासलगाव
 या वर्षी महाराष्ट्रात लाल कांद्याचे भाव टिकून होते त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. परंतु पुणे भागातील कांदा बाजारपेठेत दाखल झाला आहे. तसेच गुजरात व राजस्थान मधील कांदा आवक वाढली आहे. आता कांदा भावात सातत्य रहावे. या करीता कांदा किमान निर्यात मुल्य कमी करावे. किंवा शुन्य इतके केले तर कांदा निर्यात वाढीस मदत होईल. - नानासाहेब पाटील संचालक , नाफेड
मागणीपेक्षाही पुरवठा जास्त असल्याने केंद्र शासनाने कांदा निर्यात मुल्य कमी केले पाहीजे . तसेच कांदा आवकेत वाढ होणार असल्याने भाव कमी झाल्यावर किमान आधारभूत किमतीत कांदा खरेदी करण्यासाठी नियोजन आताच केले पाहीजे. कारण सरासरी भाव पातळी ९०० रूपये इतकी कमी झाली आहे- जयदत्त होळकर , सभापती ,लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती. 
निर्यात सुरू नाही
बाजारात नवीन आवक वाढलेली असताना केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन केले आहे . परंतु श्रीलंका वगळता अन्य कोणत्याही देशामध्ये सध्या कांद्याची निर्यात सुरू नाही.यामुळे देशांतर्गंत बाजारपेठेमध्ये कांद्याच्या दरामध्ये घट होऊ लागली आहे.

Web Title: Record fall on Lashkar-ka onion brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.