रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 01:03 AM2018-06-11T01:03:38+5:302018-06-11T01:03:38+5:30

नाशिकरोड : मुंबई-हावडा एक्स्प्रेस इगतपुरीनजीक रुळावरून घसरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले. नाशिकहून मुंबईकडे जाणाºया पंचवटी, राज्यराणी तसेच गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले.

 Railway schedule collapses | रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

Next
ठळक मुद्देहावडा एक्स्प्रेसला अपघात नाशिकरोड स्थानकावर प्रवासी ताटकळले


इगतपुरीनजीक हावडा एक्स्प्रेसचे तीन डबे रूळावरून घसल्याने गाडीला अपघात झाला. या अपघातामुळे मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची झालेली गर्दी.
नाशिकरोड : मुंबई-हावडा एक्स्प्रेस इगतपुरीनजीक रुळावरून घसरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले. नाशिकहून मुंबईकडे जाणाºया पंचवटी, राज्यराणी तसेच गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले.
रविवारी मध्यत्री मुंबई-हावडा एक्स्प्रेसचे तीन डबे इगतपुरी रेल्वे स्टेशनजवळ मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी घसरल्याने या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. मध्यरात्री अपघात झाल्यामुळे प्रत्यक्ष बचावकार्य करण्यासाठी विलंब लागल्याने या मार्गावरून धावणाºया गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.


अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नोकरदार व्यावसायिकांची पंचवटी तसेच राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द केल्याने या प्रवाशांचे हाल झाले. भुसावळ-मुंबई एक्स्प्रेस नाशिकरोडला येऊन माघारी गेली.
अन्य रेल्वेगाड्यांनादेखील एक ते दहा तास उशीर झाल्याने प्रवाशांना स्थानकातच अडकडून पडावे लागले. जवळचा प्रवास असणाºया अनेकांनी एसटी व टॅक्सीने प्रवास करणे पसंत केले.
रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने अनेक गाड्या रद्द झाल्या तर अनेक गाड्यांना मोठा विलंब झाला. प्रवासी विविध स्थानकांवर अडकून पडले. प्रवाशांना नाशिकरोड, मनमाड नाश्ता, तर भुसावळ रेल्वे स्थानकावर मोफत जेवण देण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.

पंचवटी एक्स्प्रेस रद्द
नाशिक : मनमाडहून मुंबईकडे जाणारी पंचवटी तसेच गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. भुसावळ-पुणे ही पहाटे सव्वा पाचला नाशिकरोडला येणारी गाडी तीन तास उशिरा नाशिकरोडला पोहचली. मंगला एक्स्प्रेस तीन तास, तर हावडा मेल दोन, जनता एक्स्प्रेस पाच, महानगरी अडीच तास आणि सेवाग्राम तीन तास विलंबाने धावली. मुुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाºया गाड्यांनाही विलंब झाला. रात्री १२ वाजता नाशिकरोडला येणारी कोलकाता एक्स्प्रेस रविवारी सकाळी साडेनऊला आली. कृषिनगरची नाशिकची वेळ रात्री अडीचची आहे. तथापि, ही गाडी सकाळी १० वाजता पोहचली. देवगिरी तब्बल दहा तास उशिराने धावली. काशी एक्स्प्रेला एक तास विलंब झाला. पुणे-दौंड-मनमाड मार्गे मुंबई-अमृतसर, लोकमान्य टिळक गुवाहटी, वाराणसी या गाड्या वळविण्यात आल्या-वसईरोड सुरत जळगावमार्गे पुढील गाड्या वळविण्यात आल्या.
अशी घडली घटना
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या मुंबई-हावडा एक्स्प्रेस नाशिककडे येत असताना इगतपुरी स्टेशनजवळ इंजिनापासून नवव्या क्र माकांच्या डब्याची चाके पॅन्ट्री कारचे चाक व त्यानंतर असलेल्या कोच क्र मांक एस बाराची पुढील बाजूची चाके रेल्वे रुळावरून घसरली. त्यामुळे अप व डाउनची वाहतूक ठप्प झाली. बचाव कार्यासाठी मनमाड येथून विशेष गाडी इगतपुरीकडे रवाना झाली. त्यांनी सकाळी सहाच्या सुमारास कोच हटविले.

Web Title:  Railway schedule collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.