राधा-कृष्णावरही रंगांची बरसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:53 PM2019-03-26T23:53:08+5:302019-03-27T00:10:07+5:30

द्वारका परिसरातील इस्कॉन मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरातील श्री श्री राधा-मदनगोपालजींचा या दिवशी विशेष शृंगार करण्यात आला होता.

 Radha and Krishna also color rain | राधा-कृष्णावरही रंगांची बरसात

राधा-कृष्णावरही रंगांची बरसात

Next

नाशिक : द्वारका परिसरातील इस्कॉन मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरातील श्री श्री राधा-मदनगोपालजींचा या दिवशी विशेष शृंगार करण्यात आला होता. यावेळी राधा-मदनगोपाल यांच्या मूर्तींच्या सजावटीसाठी विविध रंगांचा वापर करण्यात आला होता. सायंकाळी राधा मदनगोपाल यांच्या उत्सव मूर्तींचा विशेष शृंगार करून त्यांना गर्भगृहातून बाहेर सजविलेल्या विशेष वेदीवर स्थापन करण्यात आले व आरती करण्यात आली. यावेळी शंखनादाने रंग उधळणीला सुरु वात करण्यात आली. सुरुवातीला कोरड्या नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात येऊन नंतर उपस्थित भक्तांवर रंगीत जलाचा शिडकाव करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात भक्त व नाशिककर उपस्थित होते. कार्यक्र मानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते.

Web Title:  Radha and Krishna also color rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.