राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्तांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:59 AM2018-10-18T00:59:53+5:302018-10-18T01:00:28+5:30

राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्त/ उपविभागीय अधिकारी यांना पोलीस उपायुक्त/ अधीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश शासनाने बुधवारी (दि़१७) काढले़ पदोन्नती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील तीन, ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील दोन तर महाराष्ट्र पोलीस अकादमीतील दोन अधिकाºयांचा समावेश आहे़

Promotion to 29 Assistant Police Commissioners in the State | राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्तांना पदोन्नती

राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्तांना पदोन्नती

Next

नाशिक : राज्यातील २९ सहायक पोलीस आयुक्त/ उपविभागीय अधिकारी यांना पोलीस उपायुक्त/ अधीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश शासनाने बुधवारी (दि़१७) काढले़ पदोन्नती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील तीन, ग्रामीण पोलीस आयुक्तालयातील दोन तर महाराष्ट्र पोलीस अकादमीतील दोन अधिकाºयांचा समावेश आहे़  नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त बापू बांगर यांना सोलापूर शहर पोलीस उपायुक्त (गुन्हे), शहर वाहतूक शाखेचे अजय देवरे यांना नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी तर दीपक गिºहे यांना महाराष्ट्र पोलीस अकादमीत अपर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे़ नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे यांची धुळे येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाच्या समादेशकपदी तर नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे यांची अपर पोलीस महासंचालक कार्यालय आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती देत बदली करण्यात आली आहे़ महाराष्ट्र पोलीस अकादमीला पदोन्नतीने चार अधिकारी नव्याने मिळाले आहेत़ त्यामध्ये शिर्डी देवस्थानचे पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, गुन्हे अन्वेषण विभागातील पुणे येथील पोलीस उपअधीक्षक वैशाली कडूकर, जळगाव जिल्ह्णातील चोपडा उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार चव्हाण व औरंगाबाद जिल्ह्णातील वैजापूर उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांची महाराष्ट्र पोलीस अकादमीत अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे़
खाडे यांना पदोन्नती
महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस उपअधीक्षक डॉ़ राहुल खाडे यांची पदोन्नतीने औरंगाबाद शहराच्या पोलीस उपआयुक्तपदी तर पोलीस उपअधीक्षक विशाल ठाकूर यांची मुंबई शहराच्या पोलीस उपआयुक्तपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे़

Web Title: Promotion to 29 Assistant Police Commissioners in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.