विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:56 PM2018-10-19T17:56:05+5:302018-10-19T17:57:03+5:30

सटाणा तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण जगात अहिंसेचा संदेश पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज असल्याची माहिती मांगीतुंगी पर्वतावरील भगवान ऋषभदेव यांच्या विशालकाय १०८ फूट उंच मूर्तीच्या प्रेरणास्थान गणिनी प्रमुख श्री ज्ञानमती माता यांनी दिली.

Preparations for world peace ahimsa meeting | विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी तयारी पूर्ण

जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना परमपूज्य गणिनी प्रमुख आर्यिका श्री ज्ञानमती माताजी. समवेत प्रज्ञाश्रमणी आर्यिकारत्न चंदनामती माताजी, कर्मयोगी पीठाधिश रवींद्रकीर्ती स्वामीजी, डॉ. संजय पापडीवाल आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणाही सज्ज : राष्टÑपतींच्या हस्ते दिगंबर जैन प्रतिमा ग्रंथाचे लोकार्पण

सटाणा : तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे २२ आॅक्टोबर रोजी विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. संपूर्ण जगात अहिंसेचा संदेश पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज असल्याची माहिती मांगीतुंगी पर्वतावरील भगवान ऋषभदेव यांच्या विशालकाय १०८ फूट उंच मूर्तीच्या प्रेरणास्थान गणिनी प्रमुख श्री ज्ञानमती माता यांनी दिली.
शुक्र वारी (दि. १९) मांगीतुंगी फाट्यावरील भगवान ऋषभदेवपूरम येथील मूर्तिनिर्माण समितीच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी गणिनी प्रमुख ज्ञानमती माता यांनी माहिती दिली. याप्रसंगी आर्यिका श्री चंदनामती माता, समितीचे अध्यक्ष पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, अधिष्ठाता सी.आर. पाटील, कार्याध्यक्ष अनिल जैन, महामंत्री संजय पापडीवाल, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, विश्वस्त भूषण कासलीवाल, मंत्री विजयकुमार जैन, डॉ. जीवन प्रकाश जैन, चंद्रशेखर कासलीवाल उपस्थित होते. राष्ट्रपती कोविंद यांचे दुपारी साडेतीन वाजता एका विशेष विमानाने मांगीतुंगी येथे आगमन होणार आहे. या कार्यक्र मासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, तालिका विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पाटणी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे अध्यक्षपद भूषविणार आहेत. संमेलनास राष्ट्रपती कोविंद यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद उपस्थित राहणार असून, त्यादेखील आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा ग्रंथाचे लोकार्पण राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच समितीकडून यंदापासून देण्यात येणाऱ्या भगवान ऋषभदेव इंटरनॅशनल अवॉर्ड मुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विश्वविद्यालयाला जाहीर केला असून, तो राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते विद्यालयाचे कुलगुरू सुरेश जैन यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे श्री ज्ञानमती माता यांनी सांगितले. एक तासाच्या कार्यक्र मानंतर राष्ट्रपती कोविंद यांचे दुपारी साडेचार वाजता प्रस्थान होईल.
————————————————
भगवान ऋषभदेव यांच्या अहिंसात्मक सिद्धांताच्या प्रचार व प्रसारासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन धर्मीयांचा प्रमुख सिद्धांत अहिंसा परमोधर्म याच्या आधारे जगात शांती प्रस्थापित करण्याचे काम केले जात आहे. या संमेलनाच्या निमित्ताने जैन समाज अनेक ठिकाणी विश्वशांती अनुष्ठान , धार्मिक आयोजन, संगोष्ठी, मंत्र जप या माध्यमातून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली जाणार आहे. गणिनी प्रमुख ज्ञानमती माता म्हणाल्या की, देशात सुख, शांती प्रस्थापित करण्यासाठी भक्तिमय वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. हे काम धर्मगुरु ंचे असून, त्यासाठी धार्मिक अनुष्ठान, यज्ञ, पूजा, प्रवचन आदी कार्यक्र म राबविणे आवश्यक आहे. कुटुंब, समाज आणि देशात एकमेकांवर प्रेम, करु णा, मैत्री असेल तर निश्चितच शांती प्रस्थापित होईल.

Web Title: Preparations for world peace ahimsa meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.