सत्ता, संपत्तीपासून बहुजन समाज दूर : आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:29 AM2018-10-20T00:29:07+5:302018-10-20T00:29:51+5:30

धर्माच्या नावाखाली बहुजन समाज, अल्पसंख्याक यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.

Power and wealth away from Bahujan Samaj: Anandraj Ambedkar | सत्ता, संपत्तीपासून बहुजन समाज दूर : आनंदराज आंबेडकर

सत्ता, संपत्तीपासून बहुजन समाज दूर : आनंदराज आंबेडकर

googlenewsNext

नाशिकरोड : धर्माच्या नावाखाली बहुजन समाज, अल्पसंख्याक यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.  त्रिरश्मी लेणी येथे भारतीय बौद्ध महासभा, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्म सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकार दलित, गोरगरीब यांच्यावर अन्याय अत्याचार करीत आहेत. शासन लेणीकडे दुर्लक्ष करीत आहे. मनुवादी विचारांनी शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास दिला आहे. संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याबदल चुकीचे लिखाण करून दिशाभूल केली जात आहे. येत्या निवडणुकीत मनुवादी विचारसरणीला बाजूला करा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.  सभेच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बागुल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय दोंदे, राजाभाऊ दोंदे, विलास गांगुर्डे, रविकांत भालेराव, इंद्रजित भालेराव, विजय भालेराव, उन्मेश थोरात, रामा निकम, बापू लोखंडे, संजय सांबळे , पी. के. गांगुर्डे, भीमचंद चंद्रमोरे, भिवानंद काळे, दीपचंद दोंदे, संजय जाधव, जितेंद्र जाधव, अंबादास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.  धम्म सभेचे स्वागत प्रवीण बागुल यांनी केले. सूत्रसंचालन संजय दोंदे यांनी केले. यावेळी प्रभाकर कांबळे, संतोष सोनवणे, मनोज गाडे, प्रल्हाद उघाडे, शरद भोगे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Power and wealth away from Bahujan Samaj: Anandraj Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक