नाशिक-दिंडोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:35 PM2018-09-29T22:35:04+5:302018-09-29T22:35:16+5:30

दिंडोरी : नाशिक-कळवणकडे जाणारा व वणी येथून गुजरातकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच रस्त्याच्या कडेला नाशिक शिवारात आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून, तेथून पुढे वणीपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक बळी गेले आहेत.

Pothic empire on the Nashik-Dindori road | नाशिक-दिंडोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

नाशिक-दिंडोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

googlenewsNext
ठळक मुद्देखड्डे बुजवले नाही तर ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रवासी यांना सोबत घेऊन तळेगाव येथे रास्ता रोको

दिंडोरी : नाशिक-कळवणकडे जाणारा व वणी येथून गुजरातकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच रस्त्याच्या कडेला नाशिक शिवारात आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून, तेथून पुढे वणीपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक बळी गेले आहेत.
याबाबत बांधकाम विभाग झोपले असून, कोणतीच कार्यवाही होत नसल्याने येत्या दहा दिवसांत रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास तळेगाव दिंडोरी येथे ग्रामस्थ व शेतकरी यांना सोबत घेऊन रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा तळेगाव दिंडोरीचे माजी उपसरपंच सुदाम ढाकणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या राज्य महामार्गावर ढकांबे येथे टोलनाका होता त्यावेळेस रस्ता चांगला राहिला; पण टोलनाका बंद झाल्यानंतर या रस्त्यावर खड्डे वाढत गेले. मध्यंतरी मुरूम व दगड टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. पावसाळा सुरू आहे या नावाखाली खड्डे बुजविण्यास अडचणी येत असल्याचे व निधीही मिळत नसल्याचे कारण सार्वजनिक बांधकामकडून पुढे करण्यात आले. रस्त्याची दयनीय अवस्था पाहून व जनतेचा आक्रोश लक्षात घेऊन आमदार नरहरी झिरवाळ यांनी बैठक घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची कानउघडणी केली. त्यानंतर तात्पुरती मालपट्टी करण्यात आली. आता पाऊस उघडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेतून जागे होईल का, डांबर टाकून खड्डे बुजविण्यात येतील का, या सर्व प्रश्नांविषयी लोकप्रतिनिधी अधिकाºयांना जाब विचारतील का, अशा प्रश्नांची सरबत्ती करत निवेदनाच्या शेवटी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या १० दिवसांत खड्डे बुजवले नाही तर ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रवासी यांना सोबत घेऊन तळेगाव येथे रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा माजी उपसरपंच सुदाम ढाकणे व ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Pothic empire on the Nashik-Dindori road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.