नाशिकमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 06:36 PM2018-03-05T18:36:40+5:302018-03-05T18:36:40+5:30

दोघा संशियत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन धारदार लोखंडी कोयते, चॉपर तसेच नायलॉन दोरी व मिरची पूड असे दरोड्यासाठी पुरक असलेले साहित्य आढळून आले.

Police tried to douse the robbery in Nashik | नाशिकमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

नाशिकमध्ये दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

googlenewsNext
ठळक मुद्दे दरोड्यासाठी पुरक असलेले साहित्य आढळून आले.दोघा  संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि.४) मध्यरात्री अटक केली

पंचवटी : दरोड्याच्या तयारीसाठी पेठरोडवरील कालव्यालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर एकत्र येऊन दबा धरून बसलेल्या टोळीचा प्रयत्न पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या जागरूकतेमुळे फसला. दोघा  संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि.४) मध्यरात्री अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि.४) रात्री १० वाजता पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहायक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले, पोलीस हवालदार विलास बस्ते, मोतीराम चव्हाण, सतीश वसावे, सचिन म्हस्दे आदी पेठरोड परिसरात गस्त घालत असताना पेठरोडवरील पाटाजवळ एका झोपडीच्या मागे फुलेनगर येथील संशियत आरोपी प्रवीण अरुण लोखंडे (३०), अश्वमेघनगरचा दीपक किसन चोथवे (३०), राहुल पवार, विकी उर्फ टेंभºया भुजबळ व त्यांचा अन्य एक साथीदार यांची टोळी दबा धरून बसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्यांचा पाठलाग करून दोघा संशियत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन धारदार लोखंडी कोयते, चॉपर तसेच नायलॉन दोरी व मिरची पूड असे दरोड्यासाठी पुरक असलेले साहित्य आढळून आले. पोलिसांनी लोखंडे व चोथवे या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहे; मात्र त्यांच्या मागावरही पथक असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाणार असल्याचे बर्डेकर यांनी सांगितले. फुलेनगर, पेठरोड परिसरातील हे अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Police tried to douse the robbery in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.