पोलीस उपअधीक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:24 AM2017-11-03T00:24:27+5:302017-11-03T00:24:27+5:30

पंचवटी : रस्त्यात अचानकपणे कारचा ब्रेक मारून गाडी थांबविली, या कारणावरून कुरापत काढून आदिवासी विकास विभागातील जात पडताळणी समितीच्या पोलीस उपअधीक्षकाला तिघा संशयितांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.३१) सायंकाळी आडगाव शिवारात घडली़ शांताराम वळवी असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षकाचे नाव आहे़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Police sub-inspector beat up | पोलीस उपअधीक्षकाला मारहाण

पोलीस उपअधीक्षकाला मारहाण

Next

आडगावची घटना : तिघा संशयितांकडून मारहाण

पंचवटी : रस्त्यात अचानकपणे कारचा ब्रेक मारून गाडी थांबविली, या कारणावरून कुरापत काढून आदिवासी विकास विभागातील जात पडताळणी समितीच्या पोलीस उपअधीक्षकाला तिघा संशयितांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.३१) सायंकाळी आडगाव शिवारात घडली़ शांताराम वळवी असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षकाचे नाव आहे़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदिवासी विकास विभागाच्या जात पडताळणी समितीचे पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी हे शालक राजेश मोरे यांच्या समवेत मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आडगाव महामार्गावरून फिएस्टा कारने (क्रमांक एमएच१८, डब्ल्यू ९७५६) हॉटेल जत्राजवळील सर्व्हिसरोडने जात असताना त्यांनी अचानक कारचा ब्रेक मारला़ त्याचवेळी पाठीमागून येणाºया फॉक्स वेगन कारमधील (क्रमांक एमएच१५, एफएन २७०३) लहान मुलगा कारमध्येच आदळला़ यामुळे संतप्त झालेले संशयित नितीन गायकवाड, नकुल गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड (सर्व रा़ ज्ञानेश्वर भवन, मुक्तिधामशेजारी, एमजीरोड, नाशिक) व त्यांच्या सहकाºयांनी वळवी यांच्या कारला ओव्हरटेक करून भर रस्त्यात कार अडविली व वळवी यांना शिवीगाळ करून मारहाण
केली़
याप्रकरणी दोघांनीही आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली असता वळवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित गायकवाड व त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गायकवाड यांनीही वळवीविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Police sub-inspector beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.