नागनाथ कोतापल्ले : पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन
नाशिक : आजच्या काळात सामाजिक तत्त्वज्ञान आणि व्यवहारातील वास्तव यामध्ये तफावत असून, यातून वैचारिक मतभेद निर्माण केले जात आहेत. समाजासाठी कसे आचरण असावे, याचा विचार वेदामध्ये सांगितला आहे. मात्र वेदांमधील हे तत्त्वज्ञान आणि व्यवहारातील आचरण यात फरक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले. जि. प. रावसाहेब थोरात सभागृह येथे रविवारी माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ लिखित ‘समष्टीचे मूल्यभान’ आणि ‘सत्याच्या वाटेवर एका स्वातंत्र्याचा शोध’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन कोतापल्ले यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर फुले विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. मनोहर जाधव, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, गंगाधर अहिरे, सनदी अधिकारी योगेश भरसट, अभिमन्यू सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी योगेश भरसट, श्रीमंत माने यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी माजी सनदी अधिकारी विलास ठाकूर, डॉ. प्रल्हाद लुलेकर, उपायुक्त संदीप गोलाईत, प्रदीप पोळ, वंदना कोचुरे, देवेंद्र भुजबळ, श्रीकांत बेणी, अभिजित बगदे, इंदिरा आठवले, अनिल वैद्य आदि उपस्थित होते.