असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या पेन्शन योजनेत बदल जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शनधारकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:04 AM2017-11-17T01:04:32+5:302017-11-17T01:05:03+5:30

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या पेन्शन योजनेत बदल करून सुमारे ५१ लाख कामगारांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी काळा दिवस पाळून जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Pensioners 'Forum on the District Collectorate changed the changes in the unorganized sector workers' pension scheme | असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या पेन्शन योजनेत बदल जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शनधारकांचा मोर्चा

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या पेन्शन योजनेत बदल जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शनधारकांचा मोर्चा

Next
ठळक मुद्देभालेकर मैदानापासून हा मोर्चाजिल्हाधिकाºयांकडे मागण्यांचे निवेदनशेकडो पेन्शनर्स सहभागी

नाशिक : असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या पेन्शन योजनेत बदल करून सुमारे ५१ लाख कामगारांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी काळा दिवस पाळून जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्रीय कामगार मंत्र्यांसाठी जिल्हाधिकाºयांकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
सकाळी अकरा वाजता बी. डी. भालेकर मैदानापासून हा मोर्चा काढण्यात आला. शालिमार मार्गे टिळकपथ, महात्मा गांधी रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी मोर्चेकºयांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली तसेच त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. या मोर्चात राजू देसले, सुधाकर गुजराथी, डी. बी. जोशी, सुभाष काकड, विलास विसपुते, चेतन पणेर, शिवाजी शिंदे, बापू रांगणेकर, नारायण आडणे, प्रवीण पाटील, प्रकाश नाईक, एम. एन. लासुकर, साहेबराव शिवले, विठ्ठल देवरे, नामदेव बोराडे यांच्यासह शेकडो पेन्शनर्स सहभागी झाले होते.

Web Title: Pensioners 'Forum on the District Collectorate changed the changes in the unorganized sector workers' pension scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.