‘भोसला’तील महास्तोत्रांजलीमध्ये साडेचार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:16 AM2018-03-25T00:16:05+5:302018-03-25T00:16:05+5:30

येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानात साडेचार हजार विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.२४) सकाळी महास्तोत्रांजली पठण करीत प्रभू रामरायाला सेवा अर्पण केली. महास्तोत्रांजली कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक ओंकार उच्चाराने झाली. उद्घाटन कार्यक्र माचा प्रारंभ प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन सोसायटीचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला.

Participation of 4.5 thousand students in Mahossotranjali of Bhosala | ‘भोसला’तील महास्तोत्रांजलीमध्ये साडेचार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

‘भोसला’तील महास्तोत्रांजलीमध्ये साडेचार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

googlenewsNext

नाशिक : येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानात साडेचार हजार विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.२४) सकाळी महास्तोत्रांजली पठण करीत प्रभू रामरायाला सेवा अर्पण केली. महास्तोत्रांजली कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक ओंकार उच्चाराने झाली. उद्घाटन कार्यक्र माचा प्रारंभ प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन सोसायटीचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांच्या उपस्थि तीत पार पडला. गुढीपाडवा ते रामनवमीनिमित्त भोसला मिलिटरी स्कूलमध्ये विविध स्पर्धा, विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आलेले असून, आजच्या कार्यक्र मातही शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचा उल्लेखनीय सहभाग होता. गणपतीस्तोत्र, रामस्तुती, रामरक्षा, मारु तीस्तोत्र, हनुमान चालिसा या स्तोत्राचे सामूहिक पठण झाले. जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा यावेळी पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते साहेबराव पाटील आणि जिल्हा क्र ीडा विभागाचे अधिकारी मंगला शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, सहकार्यवाह नितीन गर्गे, भोसला मिलिटरी स्कूलचे उपाध्यक्ष प्रशांत नाईक, राजाभाऊ गुजराथी, संजय सराफ, श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष नाना वाणी यांच्यासह अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व विभागांचे शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. जन्मोत्सवानिमित्त रविवारी (दि.२५) बारा वाजता मेधाताई कुलकर्णी यांचे सुश्राव्य कीर्तन होईल.
विविध शाळांचा सहभाग
स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील शहरी आणि वनवासी अशा दोन्ही भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. त्यात वनवासी कल्याण आश्रमाच्या गुही आणि कनाशी या दोन्ही शाळा, मराठा हायस्कूल यांचा प्रामुख्याने सहभाग होता.

Web Title: Participation of 4.5 thousand students in Mahossotranjali of Bhosala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.