पंचवटी एक्स्प्रेसमध्ये पासधारकाची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:33 AM2019-01-12T00:33:35+5:302019-01-12T00:34:34+5:30

पंचवटी एक्स्प्रेसमधील सर्वसाधारण बोगीत मासिक पासधारकाने प्रवाशाची जागा अडविल्याप्रकरणी पासधारक प्रवासी कैलास बर्वे यांस रेल्वे न्यायालयाने दोन हजार रुपयांचा दंड ठोठविला आहे.

In the Panchavati Express, | पंचवटी एक्स्प्रेसमध्ये पासधारकाची अरेरावी

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये पासधारकाची अरेरावी

googlenewsNext

नाशिकरोड : पंचवटी एक्स्प्रेसमधील सर्वसाधारण बोगीत मासिक पासधारकाने प्रवाशाची जागा अडविल्याप्रकरणी पासधारक प्रवासी कैलास बर्वे यांस रेल्वे न्यायालयाने दोन हजार रुपयांचा दंड ठोठविला आहे.
रेल्वे सुरक्षा बलाचे जवान बुधवारी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत असताना मासिक पासधारक कैलास भास्कर बर्वे रा.कृष्णा आराधना सोसायटी, नारायण बापूनगर जेलरोड याने सर्वसाधारण बोगीत चढून प्रवाशांची जागा अडविली होती. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान हे तेथे पोहचले असता बर्वे याने त्यांच्याशीही दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बर्वेवर कायदेशीर कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. बर्वे याला रेल्वे न्यायालयासमोर उभे केले असता दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरिक्षक जुबेर पठाण यांनी दिली.
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये काही पासधारक सर्वसाधारण बोगीत प्रवाशांची जागा अडवतात. यावरून अनेकवेळा मासिक पासधारक सर्वसामान्य प्रवाशांशी गैरवर्तन करत दादागिरी करतात, अशी तक्रार आहे.

Web Title: In the Panchavati Express,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.